शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप! गाडीच्या काचेवर साप, दोन तास जीव मुठीत धरून केला प्रवास....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 21:15 IST

पावसाळ्यात सापाचं दर्शन रानावनात, आडवाटेवर जास्तीतजास्त रस्त्यात होऊ शकतं. पण समजा तुम्हाला गाडीच्या काचेवर साप दिसला तर तुमची काय गत होईल? मात्र एका कारमधील प्रवाशांनी या गाडीच्या काचेवरील सापासकट दोन तास प्रवास केला....

काहीवेळा अशा काही गोष्टी घडतात की भल्या भल्यांची भंबेरी उडते. माणूस कितीही तगडा असू दे पण सापाला पाहिल्यावर कोणाचीही पाचावर धारण बसू शकते. सापाची धडकी भल्या भल्यांची झोप उडवते. अशीच एक गोष्ट नाशिक-मध्यप्रदेश महामार्गावर घडलीये. पावसाळ्यात सापाचं दर्शन रानावनात, आडवाटेवर जास्तीतजास्त रस्त्यात होऊ शकतं. पण समजा तुम्हाला गाडीच्या काचेवर साप दिसला तर तुमची काय गत होईल? याचा थरारक व्हिडिओ News18 लोकमत च्या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आला आहे.

तुम्हाला या प्रश्नानेच भीती वाटली असेल पण एका व्यक्तीच्या कारच्या काचेवर सापाने दर्शन दिले तेही जेव्हा गाडी प्रवासात असताना. 11 जुलै रोजी मध्य प्रदेशमधील अंजड येथील छोटू सिंग राजपूत यांना भेटून  रत्नदिप सिसोदिया आपल्या कुटुंबीयांसह परत येत असताना त्यांच्या शेतातील घराजवळ कसे साप येतात अशा गप्पा गाडीत सुरू असताना भाचा रितेशला गाडीच्या बोनेटवर एक साप आढळून आला. गाडी महामार्गावर त्यामुळे काही करणं शक्यच नव्हतं. मग काय दोन तास रत्नदीप सिसोदिया यांनी तशीच गाडी ड्राईव्ह केली. शेवटी त्यांनी गाडी शिरपूर साखर कारखाना जवळील महामार्ग पोलिसांची चौकी गाठली.

त्यानंतर सर्पमित्र प्रेम ब्रिहाडे यांना बोलावले. गाडीच्या मागच्या बाजूला सर्प गेल्याने दहिवद येथील हॉटेल पद्मावतच्या बाजूला सर्विस स्टेशनच्या रॅम्पवरगाडी चढून अथक प्रयत्नातून सापला अखेर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आलं. तोपर्यंत ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांनी जीव मुठीत धरुन प्रवास केला होता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल