शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! रस्त्याला तडा गेल्यानं पडला २५ फूट खोल खड्डा; काही सेकंदातच महिला प्रवाश्यासह रिक्षा खड्डात

By manali.bagul | Updated: January 24, 2021 13:24 IST

रिक्षा चालकाला काही कळायच्या आतच रिक्षा  खाली पडली आणि रिक्षा चालक काहीही करू शकला नाही.  या घटनेत रिक्षा चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाले आहेत. 

राजस्थानच्या पिंक सिटीमध्ये विकास आणि रस्ते वाहतूक व्यवस्थेची चांगलीच पोलखोल झाली आहे. सचिवालायापासून एक किलोमीटर दूर असलल्या चौमूं  चौकावर शनिवारी  सकाळी अचानक एक मोठा खड्डा पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. रस्त्यावर अचानक पडलेल्या  २५ खोल आणि ३० फूट लांब खड्ड्यात एक रिक्षा पडली असून या रिक्षात एक महिला प्रवासी होती. ही घटना इतक्या अचानक घडली की, रिक्षा चालकाला काही कळायच्या आतच रिक्षा  खाली पडली आणि रिक्षा चालक काहीही करू शकला नाही.  या घटनेत रिक्षा चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाले आहेत. 

सदर घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक आणि  आजूबाजूचे रिक्षा चालक पोहोचले.  रिक्षा सुरू करण्यासाठी  वापरल्या जाणाऱ्या  दोरीचा वापर करत या  खड्ड्यातून रिक्षा चालक आणि महिलेला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर या दोघांना  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आई ती आईच! समोर आला माय लेकाच्या भेटीचा अनोखा व्हिडीओ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

जेसीबीच्या मदतीने रिक्षा बाहेर काढण्यात आली. चौंमू चौक हा सगळ्यात जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यापैकी एक आहे.  सकाळच्यावेळी ही घटना घडली असती तर नुकसानाचा सामना करावा लागला असता.  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकार आणि प्रशासनावर टिकेचा वर्षाव केला जात आहे. यापुढे असं काही होऊ नये यासाठी या घटनेची पूर्ण चौकशी व्हायला हवी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघात