शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात मुली चिडवतात, रसगुल्ला, डांबर म्हणतात! वैतागलेल्या मुलांचं थेट मुख्याध्यापकांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:43 IST

मुली दंगा करतात, खूप त्रास देतात, विचित्र नावांनी हाका मारतात; मुलांकडून तक्रारींचा पाऊस

शाळा, महाविद्यालयांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांची भांडणं होतात. चिडवाचिडवीचे प्रकार घडतात. विद्यार्थी एकमेकांची थट्टामस्करी करतात. ही मस्करी वाढली की मग पुढे वाद होतात. उत्तर प्रदेशच्या औरैयामध्ये असाच एक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार पाहून मुख्याध्यापकांना धक्का बसला आहे. 

नवोदय विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलांनी वर्गातील मुलींची मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार केली आहे. वर्गातील मुली वेगवेगळ्या नावांनी मुलांना चिडवतात. कोणाला रसगुल्ला म्हणतात, तर कोणाला डांबर म्हणतात, अशा स्वरुपाची तक्रार मुलांनी केली आहे. मुलींनी याबद्दल मुलांची माफी मागावी, अशी मागणी मुलांनी पत्रातून केली आहे. मुलांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

औरैया जवाहर नवोदय विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या मुलांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र सध्या चांगलचं चर्चेत आहे. हे पत्र वाचून अनेकांना हसू आवरता आलेलं नाही. पत्र वाचून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. सातवी (अ)च्या मुलींनी मुलांची माफी मागावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. 

पत्रात नेमकं काय?'महोदय, आम्ही इयत्ता सातवी (अ)चे विद्यार्थी आहोत. आमच्याबद्दल बोलताना मुली वाईट शब्द वापरतात. उदाहरणार्थ- लल्ला, पागल, औकातीत राहा. मुली आम्हाला विचित्र नावानं हाका मारतात. अमिनेशला डांबर म्हणतात. अनमोलला रसगुल्ला म्हणतात. मुली वर्गात गोंधळ घालतात, गाणी गातात आणि डायलॉगबाजी करतात,' असं मुलांनी पत्रात नमूद केलं आहे. पत्रात त्यांनी गोंधळ घालणाऱ्या मुलींची नावंही लिहिली आहेत. जान्हवी, शिखा, ऋतू, काजल आणि अवनी या नावांचा पत्रात समावेश आहे.