शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

शाब्बास पोरी! छेड काढणाऱ्या रोड रोमियोला शिकवला असा धडा, की स्कुटीसकट पडला नाल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 18:15 IST

 आसाममध्ये एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर येत आहे. या आधी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीच्या (Delhi) हौज खास परिसरातील दोन मुलींची छेढ काढल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. हा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता या मुलीनं छेड काढणाऱ्याला चांगलाच धडा शिकवलाय.

महिला अत्यांचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना आता आसाममध्ये एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर येत आहे. या आधी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीच्या (Delhi) हौज खास परिसरातील दोन मुलींची छेढ काढल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. हा व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता या मुलीनं छेड काढणाऱ्याला चांगलाच धडा शिकवलाय.

या तरुणीचं नाव भावना कश्यप असं आहे आणि तिनं स्वतः आपल्या फेसबुक पोस्ट करुन या संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. भावनानं सांगितलं, की एक व्यक्ती तिच्या जवळ आला आणि तिला पत्ता विचारू लागला. यावर भावनानं आपल्याला हा पत्ता माहिती नसल्याचं सांगितलं. इतक्यात स्कूटीवर असलेल्या या व्यक्तीनं भावनाच्या प्रायव्हेट पार्टला हात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भावनानंही संपूर्ण ताकत लावून या मुलाला पकडलं आणि त्याला पळू दिलं नाही. भावनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, की जेव्हा तो पळ काढू लागला तेव्हा मी माझी पूर्ण ताकत लावून त्याला मागे खेचलं. तो आपल्या स्कूटीचा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मी अर्धा मिनिटापर्यंत गाडीचा मागचा टायर वरती उचलून धरला आणि मग जोरानं धक्का दिला. यामुळे स्कूटी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडली.

भावनानं आपल्या पोस्टमध्ये या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासोबतच एक व्हिडिओ आणि फोटोदेखील अपलोड केला आहे. जेणेकरून लोकांना व्यवस्थितरित्या समजेल, की तिच्यासोबत नेमकं घडलं काय. भावनाच्या म्हणण्यानुसार, ही घटना गुवाहाटीच्या जीएस रोडवर घडली आहे. आरोपीचं नाव मधुसना राजकुमार असं असल्याचं समोर आलं आहे. प्रकरण वाढत असल्याचं पाहता आसाम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. भावनाची पोस्ट फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. तिच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल