शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानींनी साजरा केला कर्मचाऱ्याचा वाढदिवस अन् प्रायव्हेट जेटमधूनही फिरवलं, पाहा Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:38 IST

Anant Ambani Viral Video: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं नुकतंच राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न झालं.

Anant Ambani Viral Video: उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचं नुकतंच राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न झालं. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाच्या शाही थाटाचे व्हिडिओ देखील चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर आता एका वेगळ्याच कारणासाठी अनंत अंबानी पुन्हा चर्चेत आले आहेत. अनंत अंबानी यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ते आपल्या खासगी विमानात एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. अनंत अंबानींनी आपल्या कर्मचाऱ्याप्रती दाखवलेलं औदार्य नेटिझन्सना आवडलं आहे. आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

अनंत अंबानींचा हा व्हायरल व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये अंबानींचा मुलगा अनंत निळ्या शर्टमध्ये आपल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करताना दिसतो आहे. एवढंच नाही तर ते स्वत:च्या हाताने कर्मचाऱ्याला केकही खाऊ घालतात. व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनंत यांनी कर्मचार्‍याचा खास दिवस त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये साजरा केला आणि तो आणखी अविस्मरणीय बनवला. कर्मचाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

एखादा मोठा व्यक्ती जेव्हा आपल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करत असेल तेव्हा त्याच्या भावना काय असतील याची कल्पना करुनच परिस्थिती लक्षात येऊ शकते. कर्मचाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

व्हिडिओमध्ये अनंत अंबानी कर्मचाऱ्याला वाढदिवसाचा केक कापण्यात मदत करताना दिसत आहेत. मात्र, यानंतर कर्मचाऱ्यानं अनंत अंबानी यांचा आशीर्वाद घेतला. काही सेकंदांची ही क्लिप patialapolitics नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे.

अनंत अंबानी यांनी उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे. वीरेन हे Encore Healthcare Pvt. Ltd चे CEO आणि उपाध्यक्ष आहेत. राधिका आणि अनंत शाळेपासूनचे मित्र आहेत. राधिका प्रशिक्षित नृत्यांगना आहे. तिनं न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे, तर अनंतने ब्राऊन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी