शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra on Ukraine War: 'अणुबॉम्बची ताकदही फिकी पडेल'; महिंद्रांनी केले युक्रेनच्या लढवय्यांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:37 IST

Anand Mahindra on Ukraine War: आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्क टाइम्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.

आनंद महिंद्रांनी रशिया-युक्रेन युद्धप्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ही ताकद अणुबॉम्बपेक्षाही मोठी असल्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्क टाइम्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) च्या रस्त्यांवर लागलेल्या रांगा दिसत आहेत. या रांगा सामान्य नागरिकांच्या आहेत. जे आपल्या भूमीला रशियाच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी शस्त्रे हातात घेण्यासाठी तयार आहेत. 

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या नागरिकांना युद्धात लढण्यासाठी लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानंतर या रांगा देशभक्तीचे प्रतिक दाखवत आहेत. याचा व्हिडीओ शेअर करून आनंद महिंद्रा म्हणतात की, जेव्हा लोकांकडे आपल्या देशाला वाचविण्याची इच्छाशक्ती असते, तेव्हा ही ताकद कोणत्याही अण्वस्त्रापेक्षा अधिक शक्तीशाली असते. अशा लोकांवर आक्रमण करणे शक्य होईल परंतू अधिपत्य गाजविणे असंभव असेल.

झेलेंस्की यांच्या आवाहनानंतर युक्रेनच्या रस्त्यांवर हजारो नागरीक गोळा झाले आहेत. रांगेत ते शस्त्रे ताब्यात घेत आहेत. त्यांना सैन्याचे जुजबी प्रशिक्षण दिले जात आहे. या व्हिडीओमध्ये लिब बोंडारेनको नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणाने सांगितले की, रशियन हल्लेखोरांचा मुकाबला करता यावा म्हणून लोक आपली शस्त्रे घेण्यासाठी येथे थांबले आहेत. हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. मी एक सामान्य नागरिक आहे आणि कायद्याने मी अशा कोणत्याही कामात किंवा युद्धात भाग घेऊ शकत नाही. पण रशियन लोकांना माझा देश ताब्यात घ्यायचा आहे आणि मला जे आवडते ते सर्व नष्ट करायचे आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या देशाचे रक्षण केले पाहिजे, कारण हे माझे घर आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया