शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आनंद महिंद्रा झाले 'या' रिक्षा चालकाचे फॅन; स्वत:च्या CEOना दिला त्याच्याकडून शिकण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:58 IST

हा केवळ रिक्षा चालक नव्हे, तर व्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक; महिंद्रांकडून चालकाचं कौतुक

मुंबई: सध्या सोशल मीडियावर चेन्नईतील एका रिक्षा चालकाची चांगलीच चर्चा आहे. आता या चालकाचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील केलं आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकच्या सीईओंनी या रिक्षा चालकाकडून काहीतरी शिकावं असा सल्ला महिंद्रा यांनी दिला. हा चालक मॅनेजमेंटचा प्रोफेसर आहे, अशा शब्दांत महिंद्रा यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

चेन्नईत रिक्षा चालवणाऱ्या अन्ना दुरई यांचा व्हिडीओ बेटर इंडियानं ट्विट केला. त्यातून दुरई यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याची माहिती देण्यात आली होती. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. 'एमबीएच्या विद्यार्थ्यांनी  या चालकासोबत एक दिवस घालवल्यास तो त्यांच्यासाठी उत्तम अनुभव असेल. त्यातून त्यांना ग्राहक व्यवस्थापनाचा धडा मिळेल. ही व्यक्ती केवळ रिक्षा चालक नाही, तर व्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक आहे,' अशा शब्दांत महिंद्रांनी दुरई यांची स्तुती केली.

आनंद महिंद्रा केवळ दुरई यांचं कौतुक करून थांबले नाहीत. त्यांनी महिंद्रा इलेक्ट्रिकचे सीईओ सुमन मिश्रा यांना ट्विटमध्ये टॅग केलं. 'यांच्याकडून जरा शिका,' अशी सूचना मिश्रा यांनी केली. त्यावर 'महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही ही मानसिकता शिकण्यास, सहाय्य करण्यास उत्सुक आहोत,' असं मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

अन्ना दुरई यांची रिक्षा इतकी प्रसिद्ध का?अन्ना दुरई चेन्नईत रिक्षा चालवतात. त्यांची रिक्षा सामान्य रिक्षांसारखी नाही. त्यांच्या रिक्षात वायफायची सुविधा आहे. टीव्हीचीही सोय आहे. एक लहानसा फ्रीजदेखील आहे. ग्राहकांसाठी लॅपटॉप आणि टॅबलेटची सुविधा आहे. रिक्षात मासिकं, वृत्तपत्र आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा