शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टिश्यू पेपरवर बिझनेस प्रपोजल; ६ मिनिटांत मिळाली संधी, रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:08 IST

सध्या सोशल मीडियावर एका उद्योजकाची तूफान चर्चा होताना दिसत आहे.

Viral News : दिल्लीहून कोलकाता येथे जाणाऱ्या विमानातून एक उद्योगपती व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव प्रवास करत होते. सुरक्षेमुळे वैष्णव यांना भेटणे शक्य नसल्याने उद्योगपतीने आपल्या मनात असलेला एक उद्योग प्रस्ताव टिश्यू पेपरवर लिहून रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविला. त्यांचे विमान कोलकाता विमानतळावर उतरले व त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांतच उद्योग प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलाविणारा फोन त्या उद्योगपतीला आला.

पेपर नॅपकिनवर लिहिलेल्या प्रस्तावाला अश्विनी वैष्णव यांच्याकडून उत्तर येईल अशी अपेक्षा उद्योगपतीने केली नव्हती. या उद्योगपतीचे नाव अक्षय सतनालीवाला आहे. त्यांनी टिश्यूपेपरवर अश्विनी वैष्णव यांना लिहिले होते की, मी ईस्टर्न ऑर्गेनिक फर्टिलायझर या कंपनीचे प्रतिनिधित्व करतो, पश्चिम बंगालमध्ये सर्वांत मोठ्या घनकचरा व्यवस्थापन कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. रेल्वे पुरवठा श्रृंखलेचा आमची कंपनी एक अविभाज्य अंग बनू शकते, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेतही मोठे योगदान देऊ शकतो. याबाबत तुमची भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा आहे.

साधारणत: २ फेब्रुवारीच्या दिवशी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच हे उद्योगपती दिल्ली ते कोलकत्ता दरम्यान विमानाने प्रवास करत होते. केंद्रीय मंत्र्यांना फ्लाइटमध्ये पाहिल्यानंतर, त्यांच्या मनात बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या व्यवसायाच्या कल्पनाबद्दल रेल्वे मंत्र्यांसोबत  बोलण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत. मात्र, फ्लाइटमधील प्रोटोकॉल आणि कडक सुरक्षा यामुळे ते रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांनी आपल्या मनातील कल्पना  टिश्यू पेपरवर लिहण्याची भन्नाट युक्ती त्यांना सुचली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव