शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! ६० म्हशींचा सांभाळ अन् २ मजल्यांचा गोठा, पारनेरच्या मराठमोळ्या श्रद्धाचा प्रवास

By manali.bagul | Updated: November 26, 2020 19:17 IST

Inspirational success stories in Marathi : श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना १, २ नाही तर ६० म्हशींचा सांभाळ करत आहे.

आजही समाजातील अनेक स्त्री शिक्षणापासून आणि नोकरीपासून वंचित आहेत. अनेक घरात कुटुंबप्रमुख म्हणून नेहमी मुलांना पुढे आणलं जातं. आज आम्ही तुम्हाला स्त्री शक्तीची जाणीव करून देईल अशी घटना सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील तरूणीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत तब्बल ६० म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना १, २ नाही तर ६० म्हशींचा सांभाळ करत आहे.

श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहते. श्रद्धा मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील दिव्यांग असून लहान बहिण पुण्यात शिक्षण घेत आहे तर भाऊ  दहावीला आहे.

अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी

अशा स्थितीत कुटूंबाचा संपूर्ण भार श्रद्धाच्या आणि  तिच्या आईच्या खांद्यावर आला. आईचं ओझं हलकं व्हावं म्हणून ब्बल ६० म्हशींचा सांभाळ करत श्रद्धा आत्मनिर्भर बनली आहे. घराजवळच तिने या म्हशींसाठी २ मजली गोठा देखील बांधला. म्हशींसाठी २ मजली गोठा बांधणं असं जिल्ह्यात प्रथमचं झालं आहे. 

त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा

श्रद्धा रोज सकाळी  उठून स्वतःचे आवरून  म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर नेऊन घालणे हे कामं करते. यासह  म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामं श्रद्धाला करावी लागतात. या सगळ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून श्रद्धा  संध्याकाळी अभ्यासाला बसते. श्रद्धाच्या या कामाबद्दल तिच्या आई वडिलांनाच नाही तर संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटतो. गावातील लोक श्रद्धाचे कौतुक करतात.  कमी वयात एखाद्या मुलाप्रमाणे श्रद्धाने ही जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे समाजासमोर एक वेगळा आदर्श तिने ठेवला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके