शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Patient: घरात लपला होता कोरोनाचा रुग्ण; चक्क क्रेनने उचलून काढले बाहेर, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:20 IST

जवळपास 3 वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता.

नवी दिल्ली : जवळपास 3 वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. तेव्हापासून मागील दोन वर्षे या घातक आजाराने जगजीवन विस्कळीत केले होते. जगभरातील बहुतांश ठिकाणी त्याची झळ आजतागायत बसत आहे. याच आजारामुळे पहिल्यांदाच लोकांना लॉकडाऊन आणि क्वारंटाईन यांसारखे शब्द ऐकायला मिळाले. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या विषाणूने सर्वत्र कहर केला होता. मात्र लस आल्यानंतरही लोकांची या विषाणूपासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. जगातील अनेक देशांमध्ये सातत्याने कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. ज्या देशात या विषाणूचा जन्म झाला होता त्या चीनमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत आहेत. अलीकडेच चीनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये क्रेनच्या सहाय्याने रुग्णाला तेथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले. 

क्रेनच्या साहाय्याने एका व्यक्तीला घराच्या वरच्या मजल्यावरून बाहेर काढण्यात येत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा केला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकार कठोर भूमिका घेत आहे. तिथे झिरो कोविड पॉलिसी राबवली जात आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळेल तो भाग सील करण्यात येत आहे. 

चीनमध्ये कडक नियमावली कोरोनाबाबत चीनमध्ये अद्याप काही कठोर निर्बंध आहेत मात्र तरीदेखील शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये 19 नवीन रुग्ण आढळले. बीजिंग हे चीनचे एकमेव मोठे शहर आहे ज्याने अद्याप संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले नाही. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला नॅशनल गोल्डन हॉलिडेनंतर संसर्ग वाढत असल्याचे बोलले जात आहे. मागील गुरुवारी प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे बीजिंगमधील काही गृहनिर्माण वसाहती आणि खरेदी केंद्रे बंद करण्यात आली होती.  

 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या