शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:25 IST

एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली

मुंबई - दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात महिला उपनिरीक्षक आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघांमधील वादाने पोलिस ठाणे डोक्यावर घेतले. रागाच्या भरात महिला उपनिरीक्षकाने वर्दीवरील नावाचा बॅज तक्रारदाराला फेकून मारला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी गिरगाव येथील व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात घडली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेत, गिरगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे पोलिस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले. 

एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. या वादात महिला अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावाची प्लेट काढून उपस्थितांवर फेकल्याचे व्हिडीओत दिसून येते. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. 

अर्धवट व्हिडीओ अपलोडव्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात घडलेल्या राड्याची दुसरी बाजू समोर आली आहे.  प्रत्यक्षदर्शीच्या आरोपानंतर एका व्यक्तीने पोलिस कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीसह सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड करत थेट अधिकाऱ्यांवर आरोप केले. व्हिडीओ रेकॉर्ड करताना त्या व्यक्तीने थेट अधिकाऱ्याच्या बॅजवर कॅमेरा नेला आणि त्यांच्यावर दबाव आणल्याने खर्डे यांनी आपली नेमप्लेट भिंतीकडे भिरकावली. या प्रकरणाचा अर्धवट व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.

पोलिसांवर खोटे आरोप?प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने आधी कार्यालयाचा दरवाजा तोडून शिवीगाळ केली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पोलिसांवर खोटे आरोप करत गोंधळ घातला.  पगाराचे पैसे बाकी असलेल्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी नोंद केली असूनही, संबंधितांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धमकी देत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी दबाव टाकला. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसSocial Viralसोशल व्हायरल