शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तासनतास PUBG खेळण्याच्या नादात १२ वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

By manali.bagul | Updated: October 7, 2020 13:11 IST

12 year old dies after playing PUBG : वास्तवापासून दूर जाण्यासाठी माणसं गेमिंग करतात. अशावेळी बेरोजगारी, आजूबाजूला असलेला बकालपणा, मानसिक ताण जसा वाढत जाणार तसतसं गेमिंगचं प्रमाणही वाढणार

सध्या पबजी आणि इतर ऑनलाईन गेम्समुळे घरोघरची मुलं मोबाईलच्या आहारी जातात. सातत्याने हे गेम्स खेळल्यामुळे मुलांना नकळतपणे शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. गेम्स खेळण्याच्या नादात तरूणांनी आपला  जीव गमावल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. वास्तवापासून दूर जाण्यासाठी माणसं गेमिंग करतात. अशावेळी बेरोजगारी, आजूबाजूला असलेला बकालपणा, मानसिक ताण जसा वाढत जाणार तसतसं गेमिंगचं प्रमाणही वाढणार, असंही या विषयात काम करणार्‍या तज्ज्ञांना वाटतं. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे. ही घटना इजिप्तमधील मिस्त्र शहरातील आहे. 

egyptindependent च्या रिपोर्टनुसार अनेक तासांपर्यंत ब्रेक न घेता पबजी खेळल्यामुळे या १२ वर्षीय मुलाचा  हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला. काही वेळाने पालकांनी या अवस्थेत मुलाला पाहिल्यानंतर लगेचच रुग्णालयात नेलं. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळीही या मुलाच्या फोनमध्ये व्हिडीओ गेम सुरू होता. 

रुग्णालयात पोहोचेपर्यंत मृत्यू 

या लहान मुलाला पोर्ट सहिदच्या अल सलाम या रुग्लायतात नेण्यात आलं. स्थानिक पत्रकार आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेक न घेता जास्तवेळ गेम खेळल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या मृत्यूबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर अल अजहर सेंटरने  पबजी आणि इतर इलेक्ट्रोनिक व्हिडीओ गेमबाबत धोक्याची सुचना दिली आहे. सुरुवातीला आकर्षित करून गेम्स  मुलांना गुलाम बनवत असल्याचेही म्हटले आहे. गेम खेळण्याबाबत पालकांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. 

भारतात गेमिंग इंडस्ट्री झपाटय़ाने वाढण्याची काही कारणं

स्वस्त डेटा, स्मार्टफोनची सहज आणि स्वस्त उपलब्धता आणि तरुणांच्या हाती प्रचंड वेळ या गोष्टी गेमिंग इंडस्ट्रीचा पसारा वेगाने वाढवतात. भारत हे तरुण मार्केट आहे. जवळपास 75 टक्के लोकसंख्या 45 वर्ष वयोगटाच्या आतली आहे आणि त्यातही 18 ते 24 या वयोगटातल्यांची संख्या मोठी आहे, जो गेमिंगचा प्रमुख टार्गेट ग्राहक असतो. भारतात इंटरनेट यूझर्सची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. ती येत्या काळात 65 कोटींर्पयत जाईल अशी शक्यता आहे.

कालर्पयत स्मार्टफोन हे फोन करण्याचं  आणि संपर्काचं माध्यम होतं. गेमिंग, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स हे दुय्यम किंवा अधिकच्या सुविधा होत्या. ही परिस्थिती हळूहळू बदलताना दिसतेय. अनेकदा स्मार्टफोन खरेदी करताना त्यावर गेमिंग चांगल्या प्रकारे खेळता येईल ना, हे बघूनच खरेदी होते. 

कालपर्यंत गेम्स बहुदा बाहेरच्या देशात बनलेले आणि त्याच पद्धतीचे असायचे; पण आता भारतीय मानसिकतेला लक्षात घेऊन गेम्स बनवायला सुरुवात झालेली आहे. रमी आणि तीन पत्तीसारखे गेम्स त्याचंच उदाहरण आहे. 

गेमिंगमध्ये पॉर्न आणि स्पोर्ट्स या दोन गोष्टीही मोठय़ा प्रमाणावर उतरल्या आहेत. ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर तरु णाई गेमिंगकडे ओढली जाते.  2010 मध्ये गेम्स तयार करणार्‍या कंपन्यांची संख्या 35  होती. 2019 मध्ये ती 275 वर गेलेली आहे. दिवसेंदिवस गेमिंग कंपन्यांमधली गुंतवणूक वाढते आहे, याचा अर्थ मार्केटही वाढतंय किंवा ते वाढावं यासाठीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. लय भारी! कोरोनाकाळात २०० मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकानं 'असं' लावलं डोकं, पाहा फोटो

अनेक गेम्स मोफत असतात, फुकट ते पौष्टिक त्यामुळे फुकट असलेले गेम्स खेळण्याकडेही वाढता कल आहे. त्याचप्रमाणे डिजिटल पेमेंट्स करणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे माफक दारातले गेम्स विकत घेणं किंवा गेम्समधल्या गोष्टींसाठी पैसे खर्च करणंही आता हळूहळू सोपं होत जाणार आहे. आपल्याला वाटतंय त्यापेक्षा गेमिंग इंडस्ट्रीचं जाळं खूप जास्त वेगाने पसरत चाललं आहे. फक्त जगाचचं लक्ष भारताच्या या तरुण बाजारपेठेवर आहे असं नाही, भारतात उभ्या राहणार्‍या गेमिंग कंपन्यांचंही लक्ष आहेच. लय भारी! डिलिव्हरी बॉय बनून स्वप्न पूर्ण केलं, हजारोंना विकली जातेय 'त्या' नं बनवलेली सायकल 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी