शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

आशिये येथे सरोद वादनाने घेतला रसिक मनाचा ठाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:53 IST

येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे ३१ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेत पं.प्रदीप बारोट यांचे मुंबई येथील शिष्य आदित्य आपटे यांनी सुमधुर असे सरोद वादन केले. या सरोद वादनाने रसिकांच्या मनाचा अगदी ठाव घेतला. यानिमित्ताने संगीत रसिकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवता आला.

ठळक मुद्देआशिये येथे गंधर्व संगीत सभा; आदित्य आपटे यांचे सादरीकरणसरोद वादनाने घेतला रसिक मनाचा ठाव!

सुधीर राणे

कणकवली : येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे ३१ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत सभेत पं.प्रदीप बारोट यांचे मुंबई येथील शिष्य आदित्य आपटे यांनी सुमधुर असे सरोद वादन केले. या सरोद वादनाने रसिकांच्या मनाचा अगदी ठाव घेतला. यानिमित्ताने संगीत रसिकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवता आला.शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारार्थ यशस्वीपणे व डोळसपणे चालू असलेली सिंधुदुर्गातील एकमेव गंधर्व शास्त्रीय संगीत सभा ही आता कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस उतरु लागली आहे. यामध्ये दर महिन्याला एक कलाकार आपली कला सादर करतो. ३१ वी गंधर्व मासिक संगीत सभा ही आदित्य आपटे यांनी सजवली.त्यांना तबला साथ सिद्धेश कुंटे यांनी केली.आदित्य आपटे यांनी प्रथम सरोद या वाद्याची माहिती व ओळख रसिकांना करून दिली. त्यानंतर त्यांनी राग पुरिया कल्याण व तदनंतर राग मियामल्हार सादर केला. अत्यंत तरल आणि सौन्दर्यविचारपुर्वक ,शास्त्रपूर्ण आणि भावपूर्ण वादनामुळे रसिक या वादनात गुंग झाले. या कलाकारांचे स्वागत जिल्ह्यातील नामवंत नाटककार डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्याम सावंत यांनी आदित्य आपटे यांच्या कलाविचारांचा वेध घेणारी मुलाखत घेतली.यामध्ये त्यांनी सर्व प्रश्नांना अत्यंत समर्पक उत्तरे दिली.कलेप्रती प्रामाणिक आणि मेहनतीला व अभ्यासाला प्राधान्य देणारा द्रष्टा माणूस कलाकार म्हणून कसा श्रेष्ठ असतो . याचाच उपस्थित रसिकांना यानिमित्ताने अनुभव आला. अनेक पुरस्कार,अनेक पारितोषिके मिळवणारा हा सरोद वादक कलाकार गेले काही वर्षे पं.उल्हास कशाळकरांकडे गायनाचे ही धडे गिरवतो आहे, याचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना गाण्यासाठी आग्रह झाला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी केदार रागातील छोटा ख्याल गायला व "टप्पा"गायनानंतर त्यांनी मैफिलीची सांगता केली.अविनाश पटवर्धन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवलीतील संध्या पटवर्धन व त्यांच्या कुटुंबियांच्या विशेष सहकार्याने ही मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेसाठी मयूर कुलकर्णी,सागर महाडिक,किशोर सोगम ,संतोष सुतार, संदीप पेंडुरकर ,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर ,राजू करंबेळकर ,विजय घाटे,अभय खडपकर,शाम सावंत, धीरेश काणेकर,मनोज मेस्त्री यांनी विशेष मेहनत घेतली.३२ वी गंधर्व संगीत सभा २५ ऑगस्ट रोजी!३२ व्या गंधर्व संगीत सभेचे आयोजन २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. आसामच्या श्रुती बुजरबरुहा यांच्या गायनाने ही गंधर्व संगीत सभा सजणार आहे. यावेळी रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गंधर्व फाउंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग