शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

तरूणांचा स्वयंरोजगाराचा मंत्र

By admin | Updated: November 12, 2014 22:55 IST

भेडशीतील युवक : झेंडूच्या मळ्यातून कमावले दीड लाख रूपये

शिरीष नाईक -दोडामार्ग -शिक्षण करून नोकरीच मिळाली पाहिजे, असा अट्टाहास करणारे आजचे तरुण युवक ! नोकरी नाही मिळाली, तर घरीच बसून दिवस, वर्षे घालवितात. त्याउलट नोकरीच्या पाठीमागे न धावता काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगून एक उत्तम शेतकरी व उद्योजक होऊन दाखविण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील तीन युवकांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार येताच त्यांनी एका शेतकऱ्याकडून पाच गुंठे जमीन करार पद्धतीने घेऊन त्यामध्ये त्यांनी लुपिन फाऊंडेशन संस्थेकडून अडीच हजार झेंडूची झाडे तीन रुपये दराने खरेदी केली आणि त्यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यात त्या चार गुंठ्यातून दीड लाखाचे उत्पादन घेतले. अजूनही ते युवक संध्याकाळच्यावेळी मळ्यात जाऊन कष्ट, मेहनत घेतात. एकीकडे काहीतरी वेगळे करण्याची जिद्दद मनात ठेवून हे करायचं आहे, असे त्यांना मनोमन वाटते. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी गावातील हे युवक आहेत. त्यांची नावे गणपत ज्ञानेश्वर डांगी, राया अरुण भणगे आणि व्यंकटेश गवस. पैकी डांगी आणि भणगे हे सकाळच्या वेळेत मुलांना गोवा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिकवतात. तर व्यंकटेश गवस हे येथीलच शाळेत शिकवायला जातो. या तिघांशी चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले, आम्ही सकाळच्यावेळी शाळेत शिकवायला जातो. समाजात करण्यासारखे खूप काही असते. पण त्याच्याकडे नीट डोळे उघडून पाहत नाही. त्यामुळे स्पर्धेच्या युगात मागे आहोत. घाटमाथ्यावरच्या तरुणांचा विचार केला, तर जे मिळेत ते काम करतात आणि स्पर्धेत टिकतात. आमची मुले फार हुशार असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ती मागे राहतात. अशा निराश होऊन घरी बसणाऱ्या तरुणांना प्रेरणा आणि दिशा देण्यासाठी झेंडूचा मळा उभारला आहे. याची प्रेरणा घेऊन बेरोजगार तरुणांनी जमिनीत पीक घ्यावे, अशी इच्छा आहे. यातूनच काही पैसे त्यांना मिळतील. त्याचा वापर त्यांना पुढील शिक्षणासाठी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गणपत डांगी म्हणाले, मी सुशिक्षित बेरोजगार होतो. सकाळी शिवाजी हायस्कूल येथे ज्ञानदानाचे काम करतो. संध्याकाळी मित्रांबरोबर मळ्यात काम करतो. माझे म्हणणे एवढेच आहे की, जी मुले घरी बसतात, त्यांनी आपल्या जमिनीत थोडी तरी मेहनत घेऊन अशी झेंडूची झाडे लावली, तरी ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारांमध्ये बदल होईल. जर अशा मुलांना जर झेंडूची रोपे पाहिजेत, तर आम्ही उपलब्ध करून देऊ. कृषी विभागाच्याही काही योजना असतात. त्याही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पण हे सर्व करण्यासाठी मेहनत, जिद्द, कष्ट, आत्मविश्वास या गोष्टी आवश्यक आहेत. या गोष्टी असतील, तर कोणताही तरुण मागे राहणार नाही, याची मी खात्री देतो. उत्पादनतीन मित्रांनी आतापर्यंत ५० ते ६० कि लो झेंडू ९० रुपये दराने विकले आहेत. बाजारात झेंडूच्या फुलांना जास्त मागणी आहे. शेतकऱ्यांना ठोक दराने झेंडूची फुले देतो. दिवशी पाच ते सात किलो फुले विकतो, असेही त्यांनी सांगितले.