शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

नापास झाल्याने युवकाची आत्महत्या

By admin | Updated: June 23, 2014 01:31 IST

येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या मागे काल, शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे

सावंतवाडी : येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या मागे काल, शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे. हा युवक सावंतवाडीतील असून, त्याचे नाव सागर पाटील असे आहे. तो येथील कळसूलकर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी होता. दहावीत नापास झाल्यानेच त्याने आत्महत्या केली आहे. या युवकाला दोन दिवसांपूर्वी बांदा चेकपोस्टजवळ पोलिसांनी पाहिले असल्यामुळेच ही ओळख पटण्यास मदत झाली आहे. काल, शनिवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडी येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या खोलीत असलेल्या झाडाच्या मुळाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली, पण त्यांची ओळख कोणीच सांगत नव्हते. अनेकजण हा लमाणी कामगार असल्याचे म्हणत होते; पण आज, रविवारी सायंकाळी या युवकाची बांदा पोलिसांमुळे ओळख पटली. हा युवक गुरुवारी बांदा येथून मावशीच्या घराकडून सावंतवाडी येथे येताना दुपारच्या दरम्यान दिसून आला होता. त्यावेळी पोलिसांनी या युवकाची विचारपूस केली असता, मावशीच्या घरी गेलो होतो. आता सावंतवाडी येथे घरी जात असल्याचे सांगितले होते. तसेच दहावीत नापास झाल्याचेही त्याने पोलिसांकडे सांगितले होते. यावेळी या युवकाचे छायाचित्रही पोलिसांनी काढून घेतले होते. या छायाचित्रामुळेच पोलिसांनी हा युवक सावंतवाडीतील असल्याचे ओळखले. तसेच त्याचे घर हे उद्यानाच्या मागे असून, तो कळसूलकर हायस्कूलचा विद्यार्थी आहे. सागर पाटील हा यावर्षी दहावीत होता आणि तो नापास झाला. त्याने ते मनावर घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज मृत्यूपूर्वी दोन दिवस त्याने दहावीत नापास झाल्याचे बांदा पोलिसांना सांगितले होते. (वार्ताहर)