शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो पंचायत राज बळकट करा : मुक्ता दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 10:17 IST

युवावर्गाने पंचायत राज व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी केले.

ठळक मुद्देयुवकांनो पंचायत राज बळकट करा : मुक्ता दाभोलकर कणकवली महाविद्यालयात युवा नेतृत्वगुण विकास संधी कार्यशाळा

कणकवली : युवावर्गाने पंचायत राज व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी केले.ह्यपंचायत राज व्यवस्थेतील युवा नेतृत्वगुण विकास संधीह्ण या विषयावर मुंबई येथील डॉ. पी. व्ही.मंडलिक ट्रस्टच्यावतीने व कणकवली महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व ग्रामीण विकास विभागाच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत युवकांशी त्यांनी संवाद साधला.

अ‍ॅड. दाभोलकर पुढे म्हणाल्या, युवकांनी ग्रामसभेला उपस्थित रहायला हवे. तसेच शासनाच्या योजना समजावून घ्यायला हव्यात. गावाच्या विकास आराखड्यासंदर्भात माहिती करून घ्यायला हवी.

या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. शिंदे यांनीही युवकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी मंडलिक ट्रस्टच्या सचिव साधना वैराळे, अल्लाउद्दीन शेख, कार्यकर्ते हरिहर वाटवे, अर्पिता मुंबरकर, विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सत्यवान राणे आदी मान्यवर उपस्थित होते. अल्लाउद्दीन शेख यांनी ग्रामसभेची माहिती युवकांना सांगितली. तर हरिहर वाटवे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.

यावेळी कलमठ ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीच्या सदस्या सुवर्णा तांबे यांची अर्पिता मुंबरकर यांनी त्यांच्या शालेय समितीच्या कामासंदर्भात मुलाखत घेतली. यावेळी मंडलिक ट्रस्टमार्फत युवकांसाठी ग्रामसभेत उपस्थित राहून त्या कामकाजासंदर्भात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे जाहीर केले. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.युवकांनी सजग असावेमुक्ता दाभोलकर पुढे म्हणाल्या की, युवकांनी पंचायत राज व्यवस्थेत सजग भूमिका बजावायला हवी. नागरिकांनाही योजनांची माहिती करून द्यायला हवी. या कार्यक्रमात चिंतामणी सामंत आणि सिद्धी वरवडेकर यांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत कारभार या संदर्भात आपले अनुभव सांगितले. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग