शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

एकजुटीने काम करा

By admin | Updated: March 26, 2017 22:35 IST

विनायक राऊत : साळशी कुळयाचीवाडी येथील नूतन नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

शिरगांव : वाडीला, गावाला व तालुक्याला कोणते विकासकाम प्राधान्याने मार्गी लागायला हवे याचा परिपूर्ण अभ्यास असणारे पदाधिकारी व शिवसैनिक आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पुढारी म्हणून वावरणार नाहीत तर प्रत्येक घटकाच्या विकासासाठी, इच्छापूर्तीसाठी काम करतील. देवगड, वैभववाडी पंचायत समितीवर भगवा फडकलाय आता कणकवली विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी एकजुटीने सर्वानी काम करूया असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी साळशी कुळयाचीवाडी येथे केले.देवगड तालुक्यातील साळशी कुळयाचीवाडी येथील नुतन नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते पार पडले. डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत १४,१४,३६०/- रूपये खर्चून ही नळयोजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या उद्घाटन समारंभात बोलताना खासदार म्हणाले की, इतर विकास कामांपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्याने महत्व द्या. चाफेड व फणसगांवचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात वाडीवार लघुनळयोजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून या नळयोजना पुढे सुरळीत सुरू ठेवण्यासाठी समितीने घालून दिलेले नियम प्रत्येकाने पाळणे बंधनकारक असणार आहेत. त्यासाठी समन्वयाची जबाबदारी सर्वानी पार पाडावी. कोकणचा विकास फक्त भाषणे करून मोठ्या मोठ्या गमजा मारून होणार नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. रत्नागिरी पावस येथील मँगो प्रोसेसिंग क्लस्टरच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही कुडाळ येथे बांबू प्रोसेसिंग क्लस्टर सुरू होणार आहे. बांबू लागवड, प्रक्रिया उद्योग यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देवगड तालुक्यातील आनंदवाडी प्रकल्प पावसाळ््यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे मासळीवर प्रक्रिया, निर्यात, विविध सुविधा मच्छिमारांसाठी उपलब्ध होतील.प्रधानमंत्री स्वदेश दर्शनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २० कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला. त्यातून वेंगुर्ले ते विजयदुर्गपर्यंत वेगवेगळ््या सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटनाला अधिक जोमाने चालना मिळेल. अलिबागपासून सुरू होणाऱ्या कोस्टल मार्गासाठीही केंद्राकडून भरीव निधी मिळणार आहे. जिल्ह्यातील धनगरवाडे मुख्य गावांशी जोडण्यासाठी तसेच वाडी जोड रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी निधी देण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.या उद्घाटन समारंभास खासदार विनायक राऊत, देवगड पंचायत समितीच्या सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवरूखकर, विधानसभा संपर्कप्रमुख-शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुका संपर्कप्रमुख राजेंद्र फाटक, तालुकाप्रमुख मिलींद साटम, विभागप्रमुख विक्रांत नाईक, पंचायत समिती सदस्या अपूर्वा तावडे, सुनील पारकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, सदाशिव ओगले, साळशी शाखाप्रमुख रूपेश गावकर, शिरगाव शहरप्रमुख विशाल साटम, गणेश लाड, आबु तावडे, कुवळे सरपंच महेंद्र परब, चाफेड सरपंच संतोष साळसकर, कणकवली तालुकाप्रमुख सचिन सावंत, शाहू गावकर, मंगेश लोके, किशोर साळसकर, दाजी राणे, पांडुशेठ साटम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास साळसकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनीकेले. (प्रतिनिधी)