शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

राजकोट किल्ल्यावरील ९३ फूट उंच शिवपुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; १ मे रोजी लोकार्पण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 07:57 IST

शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे

मालवण : राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने १ मे रोजी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिनानिमित्ताने मालवण राजकोट किल्ला याठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा दुर्घटना घडली होती.सध्याच्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी होणारयापूर्वी उभारलेल्या शिवपुतळ्याच्याच दिशेने नवीन शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने शिवपुतळ्याचा दर्शनी भाग असणार आहे. युद्धभूमीतील योद्ध्याच्या आवेशात हा शिवपुतळा असणार आहे. छत्रपतींच्या अंगावर शाल आणि पाठीवर ढाल असणार आहे. शिवपुतळ्याचे आयुर्मान १०० वर्षे असणार आहे. त्याची १० वर्षे देखभाल, दुरुस्ती राम सुतार आर्ट क्रिएशनकडे असणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाची स्वतंत्र गुणवत्ता चाचणी, टीमकडून कामाची पाहणी व सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत.पहिल्यांदाच बांधकाम विभागाकडे जबाबदारी

  • महाराष्ट्रात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारण्याचे काम केले नव्हते. मुंबईत अरबी समुद्रातील शिवपुतळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उभारण्यासाठी देण्यात आला आहे.
  • मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मालवण राजकोट किल्ला येथील शिवपुतळा उभारण्याचे पहिल्यांदाच काम सार्वजनिक बांधकामच्या सावंतवाडी विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
  • मागील शिवपुतळा दुर्घटनेतील त्रुटींवर अभ्यास करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
  • यासाठी राजकोट किल्ला येथेच तपासणी कक्ष स्थापन केला असून, सर्व बाजूंचा विचार करूनच सार्वजनिक बांधकाम विभाग पावले टाकत आहे.
  • राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुतळा जमिनीपासून ९३ फूट उंच, चबुतरा १० मीटरशिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा असणार आहे. चबुतरा १० मीटर उंचीचा बनविण्यात आला आहे. त्यावर ६० फूट उंचीचा शिवपुतळा , शिवपुतळ्याच्या हातातील तलवार तब्बल २३ फूट उंचीची असणार आहे. त्यामुळे शिवपुतळा जमिनीपासून ९३ फूट उंचीचा बनविण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी कांस्य धातूच्या ८ मिलीमीटर जाडीच्या पत्र्याचा उपयोग करण्यात आलेला आहे. यासाठी वापरण्यात येणारे स्टिल हे स्टेनलेस स्टिल आहे. पुतळ्यासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मे. राम सुतार आर्ट क्रिएशन प्रा. लि., गाझिपूर, उत्तर प्रदेश यांच्यामार्फत हा पुतळा उभारण्यात येत आहे. यापूर्वीचा शिवपुतळा हा जमिनीपासून ४० फूट उंचीचा होता.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज