सावंतवाडी : सावंतवाडी कुटिर रूग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या कार्याची दखल आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. तसेच त्यांचा जुलैमध्ये राज्य शासनाच्यावतीने गौरव करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आजही वैद्यकीय क्षेत्रात दुर्भाटकर यांच्यासारखी माणसे आहेत, अशा शब्दात आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.सावंतवाडी कुटिर रूग्णालयात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, सहाय्यक संचालक अर्चना पाटील, शल्य चिकित्सक आर. डी. माने, वैद्यकीय अधीक्षक यु. बी. पाटील आदी उपस्थित होते. प्रथम शिवसेनेचे शहरप्रमुख शब्बीर मणियार यांनी डॉ. दुर्भाटकर याच्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सर्वांनीच आरोग्यमंत्र्यांना रूग्णालयात प्रसुती किती प्रमाणात होतात त्याची माहिती दिली. यावर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी डॉ. दुर्भाटकर यांचा पुष्पगुच्छ देत गौरव केला. तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीनेही त्यांना पुरस्कार दिला जावा, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली.तर सहाय्यक संचालक अर्चना पाटील यांनी जुलै महिन्यात उत्कृष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राज्यस्तरावर गौरव केले जातात. त्यावेळीच डॉ. दुर्भाटकर यांचा गौरव करूया, असे स्पष्ट केले.
दुर्भाटकरांच्या कार्याची शासनपातळीवर दखल
By admin | Updated: January 7, 2015 00:36 IST