शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: न्यूमोनियाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

By अनंत खं.जाधव | Updated: June 20, 2024 17:43 IST

सावंतवाडीत डेंग्यू मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव: प्रशासनाचे दुर्लक्ष 

सावंतवाडी : सावंतवाडी गेल्या काही दिवसापासून डेग्यू मलेरियाचे रूग्ण वाढत आहेत. दरम्यानच, नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक तथा कर व प्रशासकीय अधिकारी रचना कोरगावकर (वय ३९, रा. पावशी, ता. कुडाळ) यांचे न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना गेले आठवडाभर ताप येत असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच येथील उपजिल्हा रुग्णालयात ताप सर्दी खोकला यांचे रूग्ण ही आढळून येऊ लागले आहेत. अलिकडेच डेग्यू मलेरिया अशा तापाचे ३० ते ४० रूग्ण मागील आठवड्यात सापडले असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही.दरम्यानच, नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक रचना कोरगावकर याचा काल, बुधवारी अचानक मृत्यू झाला. त्या आठवडाभर आजारी होत्या. त्यातून ही त्या कार्यालयात येत असत. मंगळवारी ही त्यांनी सकाळी कार्यालयात येऊन आपले दैनंदिन कामकाज पूर्ण केले. त्यानंतर सायंकाळी घरी गेल्या. पण रात्रीच्या वेळी त्याची प्रकृती खालावली आणि त्यांना कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल, बुधवारी त्यांची प्रकृती आणखी खालवली असल्याने त्याना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात येणार होते. पण तत्पूर्वीच त्यांना श्वसनाचा अधिक त्रास जाणवू लागला आणि त्याचा मृत्यू झाला. कोरगावकर या पूर्वी कुडाळ नगरपंचायतीत कार्यरत होत्या. सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन, सिंधुदुर्ग जिल्हा, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग यांच्यातर्फे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या घटनेनंतर आता सावंतवाडी शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी