शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

काही तासातच ठरतील आमदार

By admin | Updated: October 19, 2014 00:25 IST

विधानसभा निकाल : सर्वांची उत्कंठा शिगेला

कणकवली : अनेक नाट्यमय घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या विधानसभा मतदारसंघातील लढतींचा निर्णय आता अवघ्या काही तासांवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार कोण होणार? याबाबतची उत्सुकता केवळ राजकारणातीलच नाही तर सर्वस्तरातील लोकांमध्ये पसरली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा अनुभव निर्णायक होणार की, त्यांच्या सर्वच राजकीय विरोधकांनी खेळलेल्या खेळी यशस्वी होणार याबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी काही तासातच मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पण, तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य जनतेमध्येही ‘दिल धक धक करने लगा’ अशी अवस्था आहे.सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघात बहुरंगी लढती होणार आहेत. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशिब अजमावत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह आमदार प्रमोद जठार आणि माजी आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे नीतेश राणे, भाजपातर्फे प्रमोद जठार, शिवसेनेतर्फे सुभाष मयेकर, राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे, बसपातर्फे चंद्रकांत जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे डॉ. तुळशीराम रावराणे, काँग्रेसचे बंडखोर आमदार विजय कृष्णाजी सावंत आणि विजय श्रीधर सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कणकवलीतील लढत लक्षवेधी आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे बाळा गावडे, भाजपातर्फे राजन तेली, शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी, मनसेतर्फे परशुराम उपरकर, बसपातर्फे वासुदेव जाधव, हिंदू महासभेतर्फे अजिंक्य गावडे तर अपक्ष म्हणून किशोर लोंढे, उदय पास्ते आणि संजय देसाई हे तिघेजण रिंगणात आहेत. त्यामुळे सावंतवाडीतील लढतही बहुरंगी झाली.कुडाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे नारायण राणे, भाजपातर्फे विष्णू मोंडकर, शिवसेना वैभव नाईक, राष्ट्रवादी पुष्पसेन सावंत, बसपातर्फे रवींद्र कसालकर आणि अपक्ष म्हणून स्नेहा केरकर निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्यक्षात मात्र राणे विरूद्ध नाईक अशीच खरी लढत झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रचार सभा झाल्याने त्याचा कितपत परिणाम निवडणूक निकालावर होतो हेही औत्सुक्याचे आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी घेतलेल्या सभेमुळेही निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे राजकीय वर्चस्वाची चुरस वाढलेली असताना दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढल्याने आणखीनच रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी एकत्र जमून निकाल पाहण्याचे किंबहुना निकाल‘एन्जॉय’ करण्याचे प्लॅनिंगही सुरू आहे. (वार्ताहर)