शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज अभियानातील विजेत्यांचा गौरव

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

जिल्ह्याचा सन्मान : राज्यपालांच्या हस्ते मुंबईत सन्मानपत्र प्रदान

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता तर पंचायत समिती सवर्गात राज्यात देवगड पंचायत समितीने दुसरा क्रमांक मिळविला होता तर ग्रामपंचायत स्तरावर राज्यात तृतीय क्रमांक वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीला मिळाला होता. या तिन्ही पुरस्कारांचे वितरण राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते मुंबईत झाले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रविवारी करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात यशवंत पंचायत राज अभियानात तृतीय आल्याने राज्यपाल के. विद्यासागर यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सुनिल रेडकर यांना रोख १० लाख रुपये सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविले. राज्यात यशवंत पंचायतराज अभियानात देवगड पंचायत समितीने द्वितीय पारितोषिक पटकाविल्याने राज्यपालांच्या हस्ते रोख रुपये १२ लाख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सभापती मनोज सारंग, गटविकास अधिकारी विजय चव्हाण तसेच राज्यातील या अभियानांतर्गत तृतीय क्रमांक प्राप्त परुळे बाजार ग्रामपंचायतीचा गौरव रोख रुपये १० लाख देऊन केला. या विविध तीन मिळालेल्या पुरस्कारांमुळे राज्यात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे. (प्रतिनिधी)