शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चिरेखाणी ठरणार आता पाणीसाठवण टाक्या!

By admin | Updated: August 26, 2016 01:13 IST

जीवनदायी : चार नद्यांचे होणार पुनरुज्जीवन

शोभना कांबळे -- रत्नागिरी --जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याची घोषणा केली असून, कोकणातील चार नद्यांचे पुनरूज्जीवन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कोकणात चिरेखाणी दुरूस्ती करून पाणी साठवण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचेही सुतोवाच केले आहे. रिकाम्या झालेल्या चिरेखाणींना यामुळे सुगीचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास या चिरेखाणी जीवघेण्या ठरण्याऐवजी जीवनदायी बनतील. कोकणात अनेक ठिकाणी चिरेखाणी आहेत. चिरे काढून झाले की, खाणी तशाच उघड्या ठेवल्या जातात. चिऱ्यांचे उत्खनन पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या बुजवून टाकणे किंवा त्यांच्या भोवती कुंपण घालण्याचे बंधन चिरेखाणीला परवानगी देतानाच घालण्यात आले आहे. ही अट मान्य असलेल्या चिरेखाणमालकांनाच परवाने दिले जातात. याचे कुणीही पालन करत नाहीच, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाकडून दाखवले जात नाही. चिरेखाण मालकांकडून याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे. अनेक भागात अशा रिकाम्या चिरेखाणी उघड्या असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे या चिरेखाणी उघड्या राहिल्याने पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरतात. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या या चिरेखाणींमध्ये जनावरे पडून मृत झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक व्यक्तींचेही बळी गेले आहेत. मात्र, त्याची दखल ना चिरेखाण मालकांकडून घेतली जात ना प्रशासनाकडून!मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत पडून वेळवंड येथील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना महिनाभरापूर्वीच घडली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्ह्यात परवानाधारक पण रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न किती चिरेखाण मालकांकडून झाला, किती खाणी उघड्या आहेत, याचा अहवाल गोळा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणती कार्यवाही पुढे करण्यात आली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.पाऊस मुसळधार पडला तरी पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांपासूनच कोकणात काही ठिकाणी पाणीटंचाईला सुरूवात होते. त्यामुळे अशा उघड्या असलेल्या चिरेखाणींचा उपयोग पावसाचे पाणी साठवण्यासाठी केल्यास पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल. यासाठी शासनाने घोषणाच न करता अशा रिकाम्या असलेल्या चिरेखाणींचे सर्वेक्षण करून त्याची अंमलबजावणी करायला हवी, तरच रिकाम्या असलेल्या या धोकादायक चिरेखाणी ‘जीवन’दायी ठरतील. रिकाम्या झालेल्या चिरेखाणींचा उपयोग पाणी साठवण्यासाठी चांगल्या रितीने होऊ शकेल, असं झालं तर या जीवघेण्या चिरेखाणी जीवनदायी ठरतील, अशा आशयाचे वृत्त ३० जुलै रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीधर शेंड्ये यांनी चिरेखाणींभोवती बंदिस्त कुंपण घालून त्यांचा उपयोग पावसाळ्यातील जलसंचयासाठी केला तर या चिरेखाणी घातक न ठरता उपयुक्त ठरतील, यासाठी संबंधित यंत्रणेने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी, असे मत मांडले होते. आता शासनाला उशिरा का होईना पण याबाबतचे शहाणपण सुचले, असेच म्हणायला हवे.उत्खनन करून झाले की, त्या तशाच उघड्या ठेवल्या जातात, अशा अनेक खाणी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. या रिकाम्या चिरेखाणींमध्ये पावसाळ्याच्या दिवसात पडून मृत्यू होण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यामुळे या उघड्या चिरेखाणींचा विषय ऐरणीवर असतानाच जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी चिरेखाणी दुरूस्ती करून पाणी साठवण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही केवळ घोषणाच न राहता, त्याची अंमलबजावणीही करावी.कोकणात अनेक ठिकाणी चिरेखाणी उघड्या.अटीचे पालन होत नसल्याने चिरेखाणी ठरताहेत जीवघेण्या.मालक अन् प्रशासनाकडूनही दखल घेतली जात नसल्याने जात होते अनेकांचे बळी.चिरेखाणी बंदिस्त करण्याकडे दुर्लक्ष.प्रशासनाकडून अहवाल गोळा करण्यास प्रारंभ.