शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री सिंधुदुर्गात सिटीईटी परीक्षा केंद्र सुरू करतील का?, परशुराम उपरकर यांचा सवाल

By सुधीर राणे | Updated: May 10, 2023 17:17 IST

सिंधुदुर्गातील मुलांना सीटीईटी परीक्षेसाठी राज्यातील एकही सेंटर मिळत नाही

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांनी नुकतीच शिक्षक भरती होणार असल्याचे  जाहीर केले आहे. मात्र या शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे फुल झाली असून उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे. शिक्षणमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात या परीक्षेसाठीचे केंद्र सुरू करू शकतील का? असा सवाल मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शिक्षण मंत्र्यांनी राज्यात शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केली. शिक्षक भरती करताना सीटीईटी परीक्षा अनिवार्य आहे, हे शिक्षण मंत्र्यांना माहीत असेलच. मात्र सिंधुदुर्गातील मुलांना जुलै मध्ये होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी राज्यातील एकही सेंटर मिळत नाही. सद्यस्थितीत ही सेंटर फुल दाखवण्यात येत असून सिंधुदुर्गातील मुलांना गुजरात, अहमदाबाद, बेंगलोर वगैरे ठिकाणी सेंटर उपलब्ध असल्याचे ऑनलाईनला दिसत आहे. त्यासाठी सेंटर निवडण्याची अंतिम मुदत २६ मे असून त्या अगोदरच सर्व सेंटर फुल दिसत आहेत.वास्तविक शिक्षण मंत्र्यांचा स्वतःचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग मध्ये किंवा निदान रत्नागिरीमध्ये तरी या परीक्षेसाठीचे सेंटर असण्याची गरज होती. परंतु या ठिकाणी सेंटर सुरू करणे सोडाच पण राज्यातीलही सेंटरवर मुलांना प्रवेश मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती नसल्याने प्रतीक्षेत असलेले उमेदवार अगोदरच अडचणीत असताना शिक्षण मंत्री त्यांना सिंधुदुर्ग मध्ये या परीक्षेसाठीचे सेंटर सुरू करून देऊ शकतील काय? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे.सिंधुदुर्ग मधील मोठ्या प्रमाणात डी.एड. झालेले बेरोजगार या सीटीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र,ऑनलाईनने सेंटर निवडण्यास गेल्यास परराज्यातील सेंटर उपलब्ध होत असल्याने अनेक  उमेदवार अडचणीत आहेत. यातील काहींनी आपल्याशी संपर्कही साधला. त्यामुळे शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर निदान स्वतःच्या जिल्ह्यात तरी हे सेंटर सुरू करू शकतात का ?हे पाहायचे आहे असेही परशुराम उपरकर यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर