कणकवली : गेली अनेक वर्षे राजकारणाबरोबरच समाजकारणात कार्यरत असताना कणकवली वासियांबरोबरच सिंधुदुर्गातील जनतेने दिलेले प्रेम अतुलनीय आहे. यापुढेही हे प्रेम असेच वृद्धींगत होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच पद असो अथवा नसो समाजसेवेचे व्रत यापुढेही अखंडितपणे सुरुच ठेवणार असल्याचे कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी येथे सांगितले.संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, अवधूत मालणकर, कांताप्पा शेट्ये, नगरसेविका सुविधा साटम, मेघा गांगण, माधुरी गायकवाड, समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, कन्हैय्या पारकर, गौरव हर्णे, डॉ. विद्याधर तायशेट्ये, प्रकाश पारकर, गौतम खुडकर, प्रा. दिवाकर मुरकर, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नीलम सावंत-पालव, सतीश नाईक आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजऋण फेडण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभर गेले काही दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे या कामात मला यश मिळाले आहे. महारक्तदान शिबिराला क्तदात्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो असेही पारकर यांनी यावेळी सांगितले. लक्ष्मी विष्णू हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात अनेक रुग्णांनी उपस्थिती दर्शविली. ८०० व्यक्तींना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. चंद्रकांत काळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. यश वेलणकर व डॉ. पल्लवी पाटील यांनी ‘हृदयरोग समज व गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)५१० दात्यांचे रक्तदानसंदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ५१० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात रक्तदात्यांनी गर्दी केली होती. शुभेच्छांचा वर्षाववाढदिवसानिमित्त संदेश पारकर यांच्या निवासस्थानी भेट देत जिल्ह्यातील अनेक राजकीय तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याबाहेरील व्यक्तींनीही दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. ढालकाठी येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कणकवलीतील नागरिकांनी गर्दी केली होती.
समाजसेवेचे व्रत अखंड सुरूच ठेवणार : संदेश पारकर
By admin | Updated: July 15, 2015 00:20 IST