शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सच्चे शिवसैनिक निलेश राणेंना स्वीकारणार ?, परशुराम उपरकर यांचा सवाल 

By सुधीर राणे | Updated: October 7, 2024 15:55 IST

कोकणातील घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज  

कणकवली: मी स्वतंत्र आहे, कोणत्याही पक्षाकडे प्रवेशासाठी गेलेलो नाही. परंतू निलेश राणेंच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. कोकणात राणेंच्या रुपाने सुरू असलेली घराणेशाही मतदारांनी हाणून पाडण्याची गरज आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या निलेश राणेंना सच्चे शिवसैनिक स्वीकारणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, राज्यात सर्वच राजकीय पक्षांमध्ये बापानंतर मुलगा किंवा मुलगी आमदार, खासदार होत असल्याची परिस्थिती आहे. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आपल्या मुलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक मुलगा भाजपचा आमदार आहे. आता दुसऱ्या मुलाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी त्यांची धडपड आहे. दुसरा मुलगा आमदार व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट त्यांनी घेतली आहे. मात्र, राणे आपल्या कुटुंबासाठी कितीवेळा विविध पक्षांमध्ये जातील? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी किती राहायचे हे लोकांनी ठरवले पाहिजे. काही दिवसांनी सुधीर सावंतांचे वक्तव्य खरे झालेमाजी खासदार सुधीर सावंत यांनी राणे आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केले होते. तेव्हा राजापूर न्यायालय परिसरात त्यांच्यावर दगडफेक  झाली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांनी केलेले वक्तव्य खरे झाले.तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणेंचे प्रयत्नसिंधुदुर्गातील राणेंचे काही सहकारी ते जिथे जातात तिथे जाऊन आपली पक्ष निष्ठा बाजूला ठेवून कामांचा ठेका मिळवून समाधानी राहतात. मात्र, ज्या सहकाऱ्यांना राजकीय अभिलाषा आहे, त्यांना राणेंनी झाकून ठेवले आहे. २००५ साली राणेंच्या विरोधात मी विधानसभा लढलो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केले. त्यावेळी आपल्याला कमीपणा येवू नये यासाठी राजन तेली यांना राणेंनी आमदार केले. परंतु आज गरज संपल्यावर राजन तेलींना तिकीट न मिळण्यासाठी राणे प्रयत्न करीत आहेत. 'मतदारांनी विचार करावा'आम्ही २००५ मध्ये राणेंची संगत सोडली. शिवसेनेतील आमचे जुने सहकारी व काही शिवसैनिक त्या पक्षात मी प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे समाजात काही चर्चा होत आहे. मात्र, मी अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाही. सोबतच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. आता राजकरणात जनतेची लूट करायची आणि टक्केवारीचे राजकारण करायचे, पैशाचा वापर करून निवडणूक जिंकायची असे सुरू आहे. हे आम्हाला  जमणारे नाही. मतांसाठी पैसे घ्यायचे आणि पुढील ५ वर्षे विकास कामे झाली नाही तरी गप्प बसायचे, असे मतदारांना करावे लागेल. त्यामुळे त्याचा त्यांनी जरूर विचार करावा. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणParshuram Upkarपरशुराम उपरकर Nilesh Raneनिलेश राणे