शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

प्लास्टिक बंदीचा सिंधुदुर्गात उडाला फज्जा, मोठ्या दुकानदारांकडून सर्रास विक्री

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 11, 2024 18:31 IST

कारवाईकडे होतेय दुर्लक्ष

सिंधुदुर्ग : केंद्र सरकारने एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी घातली आहे. असे असताना जिल्ह्यातील सर्वच शहरात आणि ग्रामीण भागात किरकोळ व्यावसायिकांसह मोठ्या दुकानदारांनी बंदीतही संधी साधत बंदी असलेल्या प्लास्टिकची सर्रास विक्री सुरू ठेवली आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.राज्य सरकारने एकल वापराच्या प्लास्टिकवर २०१८ मध्ये बंदी आणली होती. नगरपालिका, नगरपंचायतीच्यावतीने कारवाईचा धडाकाही लावण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जप्त केले. फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, प्लास्टिक व्यावसायिक आदींवरही कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मोहीम थंडबस्त्यात पडली. कारवाई थांबल्याने स्थानिक व्यावसायिकांकडून वाढती मागणी पाहता शहरात पुरवठा करणारी साखळीही व्यावसायिकांकडून उभारल्या गेली. त्यानंतर केंद्र सरकारने एकल वापर प्लास्टिकवर बंदी घातली.

नियंत्रण आणण्याची गरजआदेशानुसार कारवाईसाठी शहरात पथकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच हे पथकही थंडावल्याने पुन्हा राजरोसपणे किरकोळ व्यावसायिकांपासून तर मोठ्या व्यावसायिकांपर्यंत बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री केली जात आहे. काही व्यावसायिकांनी या बंदीतही संधी शोधून काढत प्लास्टिक विक्रीतून मोठा नफा कमविला जात आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

असे आहे दंडाचे स्वरूपप्लास्टिक बंदी २०२२ नियमानुसार उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी नियमभंग केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये कारवाई होते. त्यात पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार त्यानंतर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्याची तरतूद आहे.

या वस्तूंवर बंदीसजावटी प्लास्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेट पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिक कांड्यांसह, कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे चाकू, पिण्याचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर आदी. या बरोबर कंपोस्टेबल प्लास्टिक, सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, डिश बाऊल, डबे आदी बंदी आहे.

स्थानिक प्रशासनाची डोळेझाकशहरात कारवाईसाठी पालिका प्रशासनाच्यावतीने पथक तयार करण्यात आले होते. यांच्याकडून सुरुवातीला किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, मोठे मासे काही गळाला लागले नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची याकडे डोळेझाक तर होत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPlastic banप्लॅस्टिक बंदी