शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गुजरातला चांगले प्रकल्प मग प्रदूषणकारी कोकणात का?, डाॅ.जयेंद्र परुळेकर यांचा सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: April 28, 2023 18:50 IST

कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी.

सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आरोंदा खाडीपात्राची अधिकाऱ्यांसमवेत केलेली पाहाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासाठी होती की जमीन खरेदी-विक्रीसाठी होती असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते डाॅ. जयंत परूळेकर यांनी केला.कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मुळातच कोकणचा अभिमान सांगता मग या ठिकाणी चांगले प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा त्यांचे आम्ही स्वागत करू, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प डाॅ.परूळेकर यांनी,  बारसू येथे पेट्रोल केमिकल प्रकल्पाच्या निमित्ताने तेथील ग्रामस्थ व महिलांवर होणाऱ्या दडपशाही बाबत केंद्र व राज्य सरकारवर ताशेरे ओढले. बारसू येथे होणारा पेट्रोल केमिकल प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रदूषणकारी प्रकल्प आहे. मात्र सरकारकडून ग्रीन रिफायनरी म्हणून हा प्रकल्प पुढे करत आहेत. या ठिकाणी प्रदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. रोजगाराचे खोटे गाजरतब्बल प्रतिवर्षी ९ कोटी मेट्रिक टन इतका कच्च्या तेलाचा साठा याठिकाणी येणार आहे. मात्र यातून निर्माण होणारे प्रदूषण हे कोकणासह गोव्याला ही हानिकारक ठरणार आहे. रोजगाराच्या नावाखाली हा प्रकल्प येथे लादण्याचा प्रयत्न होत आहे. मुळात ऑटोमेशनच्या जमान्यात येथे केवळ शिपाई, सुरक्षा रक्षक याच नोकऱ्या शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे रोजगाराचे खोटे गाजर दाखवू नका.विकासाचा प्रकल्प पाहिजे, विषारी वायू नकोकोकणात प्रकल्प आणायला आमचा अजिबात विरोध नाही. या ठिकाणी आलेला वेदांता फाॅक्सकाॅन, टाटा एअरबाॅक्स प्रकल्प कुठे गेला? याचे उत्तर सरकारने द्यावे. आज चांगले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. ते प्रकल्प कोकणात आणा आम्ही त्यांचे स्वागत करू. कोकणी माणसांना विकासाचा प्रकल्प पाहिजे विषारी वायू नको. कोकणात आजपर्यंत आयटी सारखे प्रकल्प का आले नाही? त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेली दडपशाही सरकारने थांबवावी. जनतेला विश्वासात घ्या. त्यांना प्रकल्पाचे फायदे-तोटे समजावून नंतरच प्रकल्प लादा. कारण या देशाला आंदोलनातूनच स्वतंत्र मिळाले आहे. हे सरकारने लक्षात ठेवावे.असेही डाॅ.परुळेकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प