शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

उद्यानाचे स्वप्न पूर्ण होणार केव्हा?

By admin | Updated: January 3, 2016 00:29 IST

दोडामार्गवासीयांची पंधरा वर्षे उपेक्षा : मुलांसह वयोवृद्धांची होतेय कोंडी

शिरीष नाईक, कसई दोडामार्ग : तालुक्यातील शाळांतील विद्यार्थी, नवविवाहीत जोडपे, जेष्ठ वयोवृद्ध आजीआजोबा आदींच्या मनोरंजनासाठी सुसज्ज उद्यान आवश्यक आहे. वारंवार मागणी करूनही याकडे प्रशासनाकडून आवश्यक तसा पाठपुरावा करण्यात येत नसल्याने दोडामार्गवासीयांचे बागेचे स्वप्न सत्यात उतरणार तरी कधी? असा प्रश्न पडत आहे. २६ जून १९९९ रोजी तालुक्याची निर्मिती झाली आणि स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्माण झाला. खऱ्या अर्थाने तालुकावासीयांच्या विकासाला सुरूवात झाली. हा तालुका गोवा व कर्नाटक राज्याच्या मधोमध असल्याने दोडामार्ग तालुक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोडामार्ग निसर्गसंपन्न तालुका असून येथे साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. तालुका परिसरात पर्यटनस्थळेही आहेत. निसर्गरम्य अशा पर्यटनस्थळांमुळे दोडामार्ग तालुक्याची नवीन ओळख निर्माण झाली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या पुढाकाराने तिलारी आंतरराज्य प्रकल्प उदयास आला आणि तिलारी धरणामुळे त्यात आणखी भर पडली. येथील तेरवण मेढे, उन्नेयी बंधारा, मांगेली धबधबा, शिवकालीन राजवाडा, इतिहासकालीन गुहा, तालुक्याचे भूषण असलेला कसईनाथ डोंगर, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा, फुकेरी येथील हनुमंतगड, तेरवण मेढे येथील प्रसिद्ध नागनाथ मंदिर, तळकट वनबाग अशी विविध पर्यटनस्थळे तालुक्यात आहेत. मात्र, ही सर्व स्थळे शहरापासून दूर आहेत. गोवा बाजारपेठ जवळ असण्याबरोबरच येथील निसर्गरम्य वातावरणाने तालुका परिसरात नागरीकरणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. नवनव्या इमारतीची बांधकामे वाढत असून तालुक्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांमुळेही येथे दळणवळण वाढले आहे. शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या. मराठी शाळांबरोबर इंग्रजी शाळाही सुरू झाल्यामुळे एकत्रित तालुक्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. दोडामार्ग शहरात सुसज्ज असे सुंदर उद्यान काळाची गरज आहे. पण पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही उद्यानाचे येथील रहिवाशांचे स्वप्न स्वप्नच राहीले आहे. दरम्यान, तिलारी धरणाच्या बाजूला ५० लाख रूपये खर्च करून रॉक गार्डन बांधण्यात आले होते. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने रॉक गार्डनचे तीनतेरा वाजले. आजही गार्डन भकास दिसत आहे. दरवर्षी या गार्डनवर खर्च केला जातो. पण ही गार्डन आज अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे तालुकावासीयांना एका सुसज्ज गार्डनला मुकावे लागणार आहे. गार्डनसाठी पैसा आला, मात्र तो कुणाच्या खिशात गेला, हे मात्र समजू शकले नाही. राजकीय पुढाऱ्यांनी पाठपुरावा केला नाही. पाठपुरावा केला असेल, तर हे रॉक गार्डन अखेरची घटका मोजण्याच्या स्थितीत राहिले नसते. उद्यान झाल्यास वयोवृद्धांना पार्कमध्ये थोडा विरंगुळाही मिळेल. याशिवाय एकत्र आल्यानंतर मनातील ताण-तणाव कमी होतो व पुन्हा नव्याने जीवनाची सुरूवात करण्याची एक नवी उमेद मिळते. त्यामुळे येथे सुसज्ज गार्डन असणे आवश्यक आहे. तशी मागणी दोडामार्ग तालुकावासीय करीत आहेत. माजी सरपंच असताना येथे गार्डन होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, लोकसंख्येची अट असल्याने निधी मिळू शकला नाही. आता ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्याने निधी उपलब्ध होऊ शकतो. नगरपंचायतीत स्टाफ कमी असल्याने विकासाला गती मिळत नाही. पण उद्यानाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. - संतोष नानचे, नगराध्यक्ष, कसई-दोडामार्ग तालुक्याचा विकास झपाट्याने करण्यात येणार आहे. तालुका ठिकाणी सुसज्ज गार्डन लवकरच बांधण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्याजवळ खुले क्षेत्र आहे. सर्वांच्या सोयीसाठी अशी जागा निवडून लवकरच बगीचा बांधण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सोयीसुविधा असणार आहेत. केंद्रात व राज्यात भाजपा-सेना सत्ता असल्याने बगीच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो. - चेतन चव्हाण, नगरसेवक, कसई-दोडामार्ग सहकार्याची गरज : सर्वांनाच आनंद मिळेल कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे सुसज्ज गार्डन मिळेल, अशी अपेक्षा दोडामार्ग तालुकावासीय करीत आहेत. यासाठी नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. दोडामार्ग तालुका ठिकाणी सुसज्ज गार्डन (बगीचा) झाल्यास येथील प्रशालेतील विद्यार्थी, लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना, नवविवाहितांना तसेच शिक्षक, शिक्षिका, अधिकारी यांना विरंगुळा मिळणार आहे. मुलांना मनोरंजन मिळणार आहे. पार्कमध्ये लहानमुलांसाठी खेळणी, मनोरंजनाची साधने निर्माण केल्यास मुलांसह सर्वांनाच आनंद देणारा ठरेल.