शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराचा कळवळा का ?

By admin | Updated: August 30, 2016 23:53 IST

भालचंद्र साठेंचा जठारांना सवाल : नौटंकीबहाद्दरांची ताकद राज्याने अनुभवलीय

वैभववाडी : आमदार नीतेश राणे यांची ताकद संपूर्ण राज्याला माहित असून त्यांची हिमंत डंपर आंदोलनात सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे प्रमोद जठारांसारख्या नौटंकी बहाद्दरांनी नीतेश राणेंना आव्हान देऊ नये, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना पोपटपंची करण्यात पटाईत असलेल्या जठारांना धरणाच्या ठेकेदाराचा कळवळा का? असा सवाल साठे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा ठेकेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. त्यामुळे सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, नासीर काझी, युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण, स्वप्नील खानविलकर, रितेश सुतार आदी उपस्थित होते.भालचंद्र साठे पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकार सोडवायला तयार नसल्याने त्यांनी नीतेश राणेंना बैठक घेण्याची विनंती केली होती. पुनर्वसनाच्या कामाची काहीच प्रगती नसताना धरणाच्या पिचींगचे काम मात्र दोन वर्षे सुरु आहे. त्यामुळेच ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय शासन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही. याची खात्री झाल्यामुळेच आमदार राणे यांनी टाळे ठोकले. परंतु, ठेकेदाराचा जठारांना एवढा कळवळा का यावा. ते आमदार असताना त्यांना ठेकेदाराकडून आर्थिक लाभ होत होता की काय? असे प्रश्न साठे यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, भू-भाडे देताना ठेकेदार सहमतीपत्रावर जमीनदारांच्या सह्या घेत आहे. कालवे किंवा धरणाच्या उत्खननासाठी लागणारी जमीन कंपनीच्या नावावर खरेदी करून ठेकेदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत ठेकेदार जबरदस्तीने उत्खनन करीत आहे. तरीही सत्ताधारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार ठेकेदाराची बाजू घेतात याचे आश्चर्य वाटते. आमदार नीतेश राणेंची कृती स्टंटबाजी म्हणता मग पंचायत समिती इमारतीचा विषय ज्या पध्दतीने हाताळला ती जठारांची स्टंटबाजी नव्हती का? त्या ठेकेदाराने प्रमोद जठार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही दिले नाही; म्हणून तो विषय त्यांनी पेटवला काय? असा सवालही भालचंद्र साठे यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)संघर्ष समितीमुळेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रेंगाळलेअरुणा प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर २00७ मध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाची गरज नाही. आमचे प्रश्न आम्हीच सोडवू, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीने घेतली होती. ती भूमिका घेणारे रंगनाथ नागपच होते. संघर्ष समितीची भूमिका नारायण राणे यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले. तेच रंगनाथ नागप आता प्रमोद जठारांच्या मांडीवर बसून बोलत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य प्रश्न रखडण्यास संघर्ष समितीची ती भूमिका आणि पर्यायाने रंगनाथ नागप हेच जबाबदार आहेत, असे भालचंद्र साठे यांनी स्पष्ट केले.धरणावर जठारांच्या मशिनी असल्याचा संशयभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काँग्रेस पक्षाच्या दुकानदारीची काळजी करु नये. त्यांनी स्वत:च्या राजकीय भवितव्याचे बघावे, असा सल्ला बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी दिला आहे. जठार यांनी प्रकल्पग्रस्तांना सोडून ठेकेदाराची बाजू घेतल्यामुळे धरणावर प्रमोद जठारांच्या मशीनरी भाड्याने असल्याचा आम्हाला संशय येतो. त्यामुळेच ठेकेदाराचे काम बंद राहीले तर मशीनरीचे भाडे बुडण्याची भीती वाटत असल्यानेच जठार ठेकेदाराची बाजू घेत असावेत, असा आरोप दिलीप रावराणे यांनी केला आहे.