शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू : सुनील घाडीगांवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 21:16 IST

लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस्तीपासून लांब शाळा, सार्वजनिक ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवू, अशी भूमिका पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडली.

ठळक मुद्देचाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू : सुनील घाडीगांवकर मालवण पंचायत समिती मासिक सभेत दिली माहिती

मालवण : लॉकडाऊन शिथिल झाल्यास मुंबई, पुणे येथे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने असणाऱ्या आपल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावाकडे येण्याची परवानगी मिळावी. आम्ही आमच्या गावात अशा चाकरमान्यांची विशेष व्यवस्था करू. प्रशासनाच्या सूचनेनुसार त्यांना वस्तीपासून लांब शाळा, सार्वजनिक ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवू, अशी भूमिका पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडली.लॉकडाऊन शिथिल झाले तर तालुक्यात अन्य ठिकाणांहून येणाऱ्या कुटुंबांतील माणसांना आपण रोखणार नाही. मात्र, आपल्या आरोग्य यंत्रणेने सर्वांची तपासणी व अन्य सुरक्षा उपाययोजना यासाठी अधिक सक्षम रहायला हवे, अशी भूमिका सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, कमलाकर गावडे यांनी मांडली.सोशल डिस्टन्सिंग पाळून मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटनेते सुनील घाडीगावकर, कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.तालुक्यात डॉक्टर, नर्स, आशा व सर्व आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहेत. कोरोना आपत्ती काळातील हे काम अभिनंदनीय आहे असे सांगत अभिनंदनाचा ठराव घाडीगावकर यांनी मांडला. कमलाकर गावडे यांनी सर्वांच्या चांगल्या कामामुळे तालुका कोरोनामुक्त असल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आरोग्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत यंत्रणेमाफत सुरू असलेल्या आरोग्य उपाययोजना व संपूर्ण कामाचा लेखाजोखा मांडला.काही रास्तधान्य दुकानांच्या ठिकाणी मनमानी होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र शासन निकषानुसार लाभार्थ्यांना धान्य मिळावे. लाभार्थी यादी स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळावी. जेणेकरून प्रत्येकाला धान्य वितरण करणे सुलभ होईल. जे गावात नाहीत अशा व्यक्तींचे धान्य शिल्लक राहत असेल तर धान्यापासून वंचित असलेल्यांना ते धान्य मिळावे, अशी मागणी घाडीगावकर व उपसभापती परुळेकर यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग