शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसल्याने पळाले तोंडचे पाणी

By admin | Updated: March 11, 2017 21:16 IST

राष्ट्रीय पेयजल योजना : १६७ कामे अपूर्ण

शोभना कांबळे-- रत्नागिरी --चालू आथिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यासाठीचा २० कोटींचा निधी केंद्राकडून न आल्याने राज्याचा १६.२० कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्याचा निधी येऊनही तो खर्च करण्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शन न मिळाल्याने या योजनेची जिल्ह््यातील १६७ कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे आता राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. काही योजना या केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. त्यात काही टक्के निधी राज्य सरकारकडून जोडला जातो. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठीही केंद्र सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याला जोड निधी म्हणून राज्य सरकारकडून १६.२० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. राज्याचा हा निधी जिल्हा प्रशासनाकडे याआधीच आला आहे. मात्र, केंद्राकडून अद्यापही निधी आलेला नाही. हा निधी न आल्याने राज्याचा निधी खर्च करण्याकरिताही कुठलेच मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाही. आता आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू झाला तरी केंद्राचा वाटा अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे आलेला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. राज्याचा १६.२० कोटींचा निधीही तसाच पडून आहे.राज्य शासनाकडून या योजनांसाठी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, त्यातील केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध झालेला नाही. या योजना कशा राबवाव्यात किंवा आहे तो निधी कसा वापरावा, याबाबत मार्गदर्शनही न आल्याने योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे. निधीअभावी राष्ट्रीय पेयजल योजना अडकून पडल्या आहेत. गतवर्षीच्या शिल्लक निधीतून थोडीफार कामे झाली. पण आता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय, हा प्रश्नच आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांसाठी केंद्राकडून यावर्षीसाठी अद्याप निधीच आलेला नाही. त्यामुळे राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार आहे. यामुळे जिल्ह््यातील १६७ कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे या निधीचा विनीयोग करण्याची परवानगी मिळावी, असे साकडे आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे घातले आहे. आता यावर शासनाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)चित्र बदलले : निधी मिळण्यास विलंब नाहीकेंद्र आणि राज्याच्या संयुक्त योजना वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. केंद्राकडून त्यांचा वाटा उपलब्ध होतो. मात्र, राज्य सरकारकडून अपेक्षित असलेला निधी मिळण्यास विलंब होतो, अशी स्थिती यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. यावेळी मात्र हे चित्र बदलले आहे. राज्य सरकारचा वाटा असलेली रक्कम उपलब्ध झाली असली, तरी केंद्र शासनाकडून अजूनही निधी मिळालेला नाही.राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी; जिल्हा प्रशासनाची राज्य शासनाकडे मागणी.राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार.केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध नाही.आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय?नवीन प्रश्न उभा.होळीचा होम पेटला... : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील श्रीदेवी तळेकरीणचा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त होम पेटविण्यात आला. या होमात नारळ अर्पण करण्यासाठी नवदाम्पत्यांची गर्दी झाली होती.