शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचा सिंधुदुर्गातील ५८ गावांना फायदा, ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:34 IST

पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे ३३३0.७३ टीसीएम पाणीसाठवण क्षमतेची निर्मिती फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत होणार

सिंधुदुर्गनगरी : पाणी टंचाईवर मात, दुबार पिक व फळझाड लागवडीखाली क्षेत्रात भरघोस वाढ व्हावी हा उद्देश समोर ठेऊन राज्य शासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरू केलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांत या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५८ गावांना फायदा झाला असून या गावांमध्ये एकूण ३३३०.७३ टीसीएम एवढ्या पाणी साठवण क्षमतेची निर्मिती झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील दुबार पीक व फळझाड लागवडीखालील क्षेत्रही वाढण्यास मदत झाली आहे.सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९ अंतर्गत २०१५-१६ पासून महाराष्ट्र शासन ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण ही महत्त्वाकांशी योजना राबवित आहे. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणलोट प्रकल्प पूर्ण झालेल्या तसेच पाणीटंचाई जाणवणाºया गावांची निवड या अभियानात करून ती गावे पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यासाठी गावातील नागरिकांच्या सहकार्याने करावयाच्या उपाययोजनांचे आराखडे बनविले जातात. तर गावात शिवार फेरी काढून याबाबत जनजागृती केली जाते. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या पाच वर्षात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पाणी टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे.

२०१५-१६ या पहिल्या वर्षी ३५ गावांची निवड प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली होती. या गावांत पाणी साठा सुरक्षित करणारी ४९४ कामे करण्यात आली होती. १७ कोटी ३९ लाख २८ हजार रुपये एवढा निधी यासाठी खर्च करण्यात आला. ही सर्व कामे पूर्ण झाली असून यामुळे २६०७.३० टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमतेची निर्मिती होऊ शकली आहे. ९३५.८१ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. परिणामी दुबार पिकाखाली व फळझाड लागवडीखाली क्षेत्र या गावातील वाढले आहे.

२०१६-१७ मध्ये २३ गावांची जलयुक्तमध्ये निवड करण्यात आली. २७२ कामांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील २६९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. २३८ कामे सुरु झाली असून २०६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांवर पाच कोटी ९१ लाख ७३ हजार रुपये एवढा खर्च झाला आहे.

या पूर्ण झालेल्या कामामुळे ७२३.४३ टीसीएम एवढी पाण्याची साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. ११३४.७३ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येऊ शकले. परिणामी दुबार पिकाखालील क्षेत्र ६४० हेक्टरने वाढू शकले. तर फळबाग लागवडीखालील क्षेत्रातही ५०० हेक्टरने वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेची सर्व कामे पूर्ण झाल्यावर या जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात होणाºया संभाव्य पाणीटंचाईवर काही अंशी मात करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ गावेजलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात हडपीड, वाघिवरे, शिरवली, कोटकामते, कुवळे, नाधवडे, हरकुळ खुर्द, करंजे, कोळोशी, ओझरम, नागसावंतवाडी, कुणकवळे, चुनवरे, चिंदर, कर्लाचा व्हाळ, तुळसुली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापूर, भडगाव, गोठोस, आवळेगाव, कोचरा, आरवली, सोनुर्ली, केसरी, भालावल बावळाट, निरवडे, तांबोळी, तळकट, फुकेरी, पालये, कुंभवडे, कोंडये.

दुसऱ्या टप्प्यात २३ गावांचा समावेशजलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात वळीवंडे, शेवरे, उंबर्डे, तिरवडे तर्फ खारेपाटण, वारगाव, कसवण-तळवडे, धारेश्वर-कासार्डे, वायंगणी, वराड, पोईप, मसुरे, किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर, साळगाव, रावदस-कुसेवाडा, पेंडुर, मळगाव, गेळे, नेमळे, माजगाव, माटणे, वझरे या जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सन ३0१६-१७ या आर्थिक वर्षात कामे करण्यात आली आहेत.

मानस पूर्णत्वास जाईल२०१७-१८ या वर्षासाठी ३७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. पाणलोटची ८०० कामे प्रस्तावित करून १४ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

या आराखड्यानुसार कामे पूर्ण झाल्यास संरक्षित, फळबाग लागवड, दुबार पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार असून जिल्ह्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानचा पाणी टंचाईमुक्त गावे हा मानस पूर्णत्वाकडे जाताना या जिल्ह्यात दिसत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग