शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आमदारांकडून लोकांच्या अपेक्षांवर पाणी

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

नीतेश राणेंची जठारांवर टीका : देवगड, वैभववाडी वायफाय सुविधेबाबत माहिती

कणकवली : विद्यमान आमदारांकडून गेल्या पाच वर्षात लोकांच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आमदारांनी स्वत:च कबूल केले आहे की, आपल्याकडून १0 टक्केच काम झाले. युती शासन आले तर उर्वरित काम करण्यात येईल. त्यामुळे ज्यांचा स्वत:वरच विश्वास नाही ते निवडणूक काय जिंकणार? आमदारांना प्रगती पुस्तक काढायला मुंबईला जावे लागते यातच त्यांचे अपयश सिद्ध झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी आमदार प्रमोद जठार यांच्यावर केला.कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना नीतेश राणे म्हणाले, आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही चांगले काम केले नाही. नुसती पोपटपंची केली. वैभववाडी बस डेपोचा नारळ फोडला. मात्र, पुढे काहीच केले नाही. या जागेचे संपादनदेखील झाले नाही. आगामी काळात आपण जनतेसमोर सत्य परिस्थिती आणणार आहे. मात्र, वैयक्तिक कोणतीही टीकाटिप्पणी करणार नाही. दूध डेअरी चालू केली म्हणतात परंतु त्यातील दूध कोल्हापूरहून आणले जाते. त्यात काम करणारे कामगार हे परप्रांतिय आहेत. त्यामुळे त्याबाबतची वाच्यता वेळ येताच आपण करू. सध्या कणकवली मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी आपण घेत आहोत. देवगडमध्ये १00 घरांमध्ये जावून आपण गणेश दर्शन घेतले आहे. तसेच कणकवलीतील खारेपाटण आणि काही ग्रामीण भागात लोकांमध्ये जावून आपण देवदर्शन घेतले. उवरित दोन दिवसात कणकवली शहर आणि वैभववाडी शहरातील गणेश दर्शन घेणार आहे. तसेच यावेळी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांसह लोकांच्या घेतलेल्या भेटीमध्ये विद्यमान आमदारांबाबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर असलेल्या नाराजीचा सूर दिसत आहे. नुसती पोपटपंची करून चालणार नाही. विजय सावंत यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत पत्रकारांनी छेडले असता त्या विषयावर आताच बोलणे उचित नाही. आधी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होवू दे चित्र स्पष्ट झाल्यावरच आपण बोलू, अशी बगल राणे यांनी दिली. आपण निवडणुकीला सामोरे जाताना विकासाचे मुद्दे घेवून जाणार आहे. वैयक्तिक टीका टिप्पणीत रस नाही. प्रत्येक उमेदवाराने विकासात्मक स्पर्धा केली पाहिजे, असेही नीतेश राणे म्हणाले. (प्रतिनिधी)