शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात जाणवणार जलसंकटाचे चटके ?

By admin | Updated: April 16, 2017 23:21 IST

बाष्पीभवनाचे ग्रहण : विहिरीतील पाण्याने आताच गाठला तळ

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीजिल्ह्यात गेल्या हंगामात पाऊस मोठ्या प्रमाणात पडूनही यावेळी तापमानात मोठी वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग खूप वाढला आहे. महिनाभरापासून सतत वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहेच, परंतु उपलब्ध पाणी साठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच विहिरींतील पाण्याने तळ गाठला असून, पाणी खरवडून काढण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील अनेक गावे यावेळी पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत, तर काही गावांवर पाणीटंचाईची तलवार टांगली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यात १९ गावांमधील ३३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट आवासून उभे ठाकले आहे. गावे व वाड्यांची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ज्या गावांमध्ये टंचाईचे संकट आहे, त्यामधील ५ गावांतील वाड्यांनाच २ टॅँकरद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित १४ गावे व त्यामधील टंचाईग्रस्त वाड्यांना पाणी कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील कातुर्डी कोंड या गावात सर्वप्रथम पाण्याचा टॅँकर धावला. त्यानंतर बेलारी, माची -धनगरवाडी, निवळी - धनगरवाडी, श्रुंगारपूर, कातुर्डी नेरदवाडी व अन्य वाड्यांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.चिपळूण तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या २८ झाली आहे. त्यापैकी ६ गावांतील १२ वाड्यांना सध्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही पाच गावे व १६ वाड्या तहानलेल्या आहेत. या गावांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यातील १६ गावांमधील वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अजून असंख्य गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून, त्या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर व दापोली तालुक्यातही अनेक गावे व वाड्यांनी टंचाईमुळे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची सध्याची संख्या पाहता तापमान वाढीने हे जलसंकट मे महिन्यात अधिकच भयावह होण्याची भीती आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने तापमान वाढत असून, ३७ ते ३८ अंशांवर तापमान पोहोचले आहेत.मध्यम प्रकल्पातही पाणी...जिल्ह्यात नातूवाडी मध्यम प्रकल्पात व अर्जुना (राजापूर) या मध्यम प्रकल्पातही चांगला पाणीसाठा आहे. परंतु लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतील पाणी जलसिंचनाप्रमाणेच स्थानिक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांना कितपत पुरेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील ९१ पाणी योजना धरणांच्या शेजारी जॅकवेल उभारून चालविल्या जातात. मात्र, जिल्ह्यातील अन्य नळयोजनांना या धरणांमधील अतिरिक्त पाणीसाठ्याची उपलब्धता होत नाही.