शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विर्डी-तळेखोल येथे कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: December 16, 2014 23:42 IST

ग्रामस्थांचा आरोप : गोव्यातील व्यावसायिकांकडून प्रकार

दोडामार्ग : महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी-तळेखोल रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा नजीकच्या गोवा राज्यातून आणून टाकला जात असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे गोव्यातील काही व्यावसायिकांना कचरा टाकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पुन्हा कचरा न करण्याबाबत चांगलीच तंबी दिली होती; पण वर्षभरानंतर पुन्हा एकदा कचरा टाकण्यासाठी गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दोडामार्ग तालुका गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसला आहे. याच तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेखोल-विर्डी गावाचा गोव्यातील काही व्यावसायिकांकडून कचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. ही दोन्ही गावे गोवा राज्याच्या सीमेला लागूनच हाकेच्या अंतरावर असल्याने गोव्यातील कचरा अज्ञातांकडून आणून टाकण्याचे काम केले जात आहे. या कचऱ्यात टाकाऊ जैविक वस्तूंचा जास्त समावेश आहे. त्यात सुया, इंजेक्शने तसेच काचेच्या बाटल्या व झोपण्याच्या गादीत वापरल्या जाणाऱ्या लगद्यांचा समावेश आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या पिशव्यांमध्ये जनावरांच्या शरीरावरील टाकाऊ मांस भरून त्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा गोव्यातूनच आणून टाकला जात असावा, असा संशय परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)ग्रामस्थांकडून व्यावसायिकांना समजयापूर्वीही अशाच पद्धतीने रात्रीच्यावेळी कचरा टाकताना गोव्यातील काही व्यावसायिकांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते. त्यावेळी त्यांना यापुढे कचरा न टाकण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर कचरा टाकणे बंद होते. परंतु, पुन्हा एकदा गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा कचऱ्यासाठी डंपिंग ग्राऊंड म्हणून वापर होऊ लागला आहे. त्यामुळे विर्डी-तळेखोल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे.