कणकवली : वागदेतील ओमसाई रेसिडेन्सीतील चार घरे फोडल्याचे प्रकार घडला होता. याच वसाहतीतील आणखी सात घरे फोडल्याचे रविवारी उघड झाले. घरमालक परगावी असल्याने नेमका किती मुद्देमाल गेला याबद्दल समजू शकलेले नाही. पोलीस पाटील सुनिल कदम यांना कोणीतरी फोनवरून याबाबत माहिती दिली. फोडण्यात आलेल्या बंगल्यांतील बॅगा आदी सामान विस्कटण्यात आले होते. बुधवारीच सातरल-कासरल मार्गावरील वागदे येथील ओम साई रेसिडेन्सी कॉलनीमधील चार बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार उघड झाला होता. बंगल्यांमधील टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले. बंगल्याचे मालक मुंबई तसेच अन्य ठिकाणी कामानिमित्त राहतात. या कॉलनीतील अनेक बंगले बंदच असतात. चोरी झालेली सात बंगलेही बंद असून मालक बाहेरगावी आहेत. त्यामुळे या बंगल्यांमधून नेमका किती मुद्देमाल चोरण्यात आला याबद्दल माहिती मिळालेली नाही. (प्रतिनिधी)
वागदे येथे आणखी सात घरे फोडल्याचे उघडकीस
By admin | Updated: August 24, 2014 22:39 IST