शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीत भाविकांना दहा रांगांतून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:13 IST

मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी पहाटे ...

मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी पहाटे यात्रेला सुरुवात होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाकेलेली विद्युत रोषणाई आकर्षण ठरत होती. आंगणे कुटुंबीयांनी वार्षिकोत्सव साजरा करण्यासाठी चोखनियोजन केले आहे. भाविकांना दहा रांगांतून देवीचे सुलभ दर्शन घेता येणार आहे.दरम्यान, सुमारे सात ते आठ लाख भाविक यात्रोत्सवाला उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रेला होणारी उच्चांकी गर्दी लक्षात घेऊन आंगणेवाडी ग्रामस्थ, महसूल, वीज वितरण, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. विविध प्रकारची दुकाने, स्वागत कमानी तसेच विद्युत रोषणाईने आंगणेवाडी सजली आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांची शिबिरे, कबड्डी स्पर्धा, शुटींग बॉल स्पर्धा यांसह अन्य करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.भराडी देवीच्या यात्रोत्सवास सोमवारी पहाटे सुरुवात होणार आहे. यात्रोत्सवात भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून उड्डाणपुलासह व्हीआयपी रांगा, तसेच आठ रांगा तर दोन जादा रांगा अशा दहा रांगांतून दर्शनहोणार आहे. तुलाभार सुलभ होण्यासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविकांना नवस फेडणे सुलभ होणार आहे.पहाटे ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रसाद (ताटे लावणे) कार्यक्रमावेळी दर्शन रांगा बंद केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा दर्शन व ओटी भरण्याच्या रांगा सुरू होतील. मंगळवारीही ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी रांगा सुरू राहतील, असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे यांनी सांगितले.आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेसाठी मालवण आगारातून ४६ एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ रोजी पहाटेपासून मालवण एसटी आगारातून आंगणेवाडी येथे जाण्यासाठी बसफेºया रवाना होणार आहेत. मालवण बसस्थानकातून १८ एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.तसेच तालुक्याच्या अन्य भागातून २८ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. टोपीवाला हायस्कूल येथून तीन एसटी गाड्या, देवबाग तारकर्ली येथून तीन एसटी गाड्या, सर्जेकोट येथून दोन एसटी गाड्या, आनंदव्हाळ, डांगमोडे येथून एका एसटीचे नियोजन करण्यात आले आहे.चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मालवण-बोरिवली एसटी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.