शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

विनायक राऊत यांचा विजय

By admin | Updated: May 17, 2014 00:07 IST

रत्नागिरी : सर्वपक्षीय विरोधातून तयार झालेल्या वातावरणाचा मोठा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार नीलेश राणे यांना बसला.

रत्नागिरी : सर्वपक्षीय विरोधातून तयार झालेल्या वातावरणाचा मोठा फटका रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान खासदार नीलेश राणे यांना बसला. महायुतीच्या विनायक राऊत यांनी त्यांचा तब्बल १ लाख ५० हजार ५१ मतांनी पराभव केला. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला आहे. केवळ रत्नागिरीच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातूनही राऊत यांनाच मताधिक्य मिळाले. रायगड मतदारसंघात शिवसेनेचे अंनत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा अवघ्या २,२१० मतांनी पराभव केला. गीते यांना ३,९६,०६५ मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विनायक राऊत यांनी सात हजाराची आघाडी मिळवली आणि हाच सर्वांसाठी धक्का होता. मतमोजणीसाठी आलेले नीलेश राणे या फेरीनंतर केंद्रातून निघून गेले. तेव्हापासून सुरू झालेली मताधिक्याची मालिका शेवटच्या फेरीपर्यंत तशीच सुरू राहिली. मोजणीच्या तब्बल २५ फेर्‍या झाल्या. विधानसभानिहाय मतांचा विचार केला तर राऊत यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले सावंतवाडी मतदारसंघात. येथे नीलेश राणेंपेक्षा त्यांना ४१ हजार मतांची आघाडी मिळाली. त्याखालोखाल मताधिक्य मिळाले ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात. राऊत यांना येथे ३१ हजार ५६५ आणि चिपळूण मतदारसंघात ३१ हजार १४० मतांची आघाडी मिळाली. राजापूर मतदारसंघात राऊत यांनी २२ हजार ३१५ मतांची आघाडी घेतली. नारायण राणे ज्या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, त्या कुडाळ-मालवण मतदारसंघातही राऊत यांना २१ हजार ८८३ मतांची आघाडी मिळाली.काँग्रेसला किंबहुना नारायण राणे यांना मोठी आशा कणकवली-देवगड मतदारसंघावर होती. इतर ठिकाणी कमी होणारी मते कणकवलीतून मिळणार्‍या मोठ्या आघाडीतून भरून काढण्याचा अंदाज बांधला जात होता, पण प्रत्यक्षात येथेही विनायक राऊत यांना १,३७७ मतांची आघाडी मिळाली. पोस्टल मतांसह राऊत यांना ४ लाख ९३,०८८, तर नीलेश राणे यांना ३ लाख ४३,०३७ इतकी मते मिळाली. राऊत १, ५०,०५१ मतांनी विजयी झाले. (प्रतिनिधी)