शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वैभव नाईकांची एसीबीकडे तक्रार करणारा विनायक राऊतांचा कट्टर कार्यकर्ता - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: October 17, 2022 16:37 IST

Nitesh Rane : खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

कणकवली : आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीकडे ज्याने तक्रार केली तो कार्यकर्ता खासदार विनायक राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याला वसईमध्ये खासदार विनायक राऊत यांनी घर घेऊन दिले होते. खासदार राऊत यांच्या जवळचीच व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने खासदार राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा होता. खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांजवळ नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.ते म्हणाले, आमदार नाईक यांच्याविरुद्ध ज्याने तक्रार केली आहे, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने आपण तक्रार केली असल्याचे ट्विटर द्वारे म्हटलेले आहे. तो विनायक राऊत यांचा चाहता आहे. वसई येथे त्याचे राहते घर राऊत यांनी दिले असे त्याचे म्हणणे आहे. 

जर विनायक राऊत यांच्या जवळची व्यक्ती आमदारांविरुद्ध तक्रार करत असेल, तर मोर्चा एसीबीच्या कार्यालयावर का? तो विनायक राऊतांच्या  घरावर काढायला हवा. हा त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे. मग ही टीका भाजपवर का?  त्या तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे करून आमच्या 'अधीश' बंगल्याबाबतही तक्रार करण्यात आली होती. आता शिवसेनेअंतर्गत  राऊत त्याचा वापर करीत आहेत. तक्रारदार हा राऊत यांचा समर्थक आहे, त्याचा पुरावाही आमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपवर आरोप करण्यापेक्षा  राऊत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवण्यासाठी  ही सारी नाटके चालू आहेत. आमदार नाईक यांना भाजपात कोणीही बोलावलेले नाही. त्यांना कोणी आमंत्रण दिले आहे?  त्याचा पुरावा द्यावा.

यावेळी नीतेश राणे यांनी तक्रारदाराच्या ट्विटर हँडलवरील शिवसेनेचे मशाल चिन्ह असलेले फोटो सादर केले  अंतर्गत वादातून हे चालू असून त्यात भाजपची बदनामी का करताय? आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या दोन राऊत यांनी आमची वाट लावली असे नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार राऊत यांचा आमदार नाईक यांना अडचणीत आणण्यामागे काय उद्देश आहे? हे त्यांनाच विचारा असेही नीतेश राणे म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे