शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे 'हे' गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 13:07 IST

देश-विदेशातील पर्यटक देतात या गावाला भेट, कोणत आहे 'हे' गाव..

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : आशिया खंडातील सर्वात स्वच्छ असलेल्या मावलीनोंग गावाला सिंधुदुर्ग मुख्यालय पत्रकारांनी भेट दिली. स्वच्छतेत अव्वल असलेले मावलीनोंग हे खेडेगाव मेघालय राज्यातील शिलाँगपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. अवघी पाचशे ते सहाशे लोकांची वस्ती असलेले हे गाव आशिया खंडात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहे. गावाची स्वच्छता कशी असावी आणि कशी राखावी हे या गावातील ग्रामस्थांकडून शिकावे. म्हणूनच देश-विदेशातून पर्यटक या गावाला मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत असलेल्या पत्रकारांचा अभ्यास दौरा आसाम, मेघालय येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान मेघालय राज्यातील या सुंदर गावाला पत्रकारांनी भेट देत पाहणी केली. जिल्हा प्रशासनाचे नोडल ऑफिसर म्हणून विलास आरोंदेकर या टीममध्ये सहभागी झाले होते.गावात प्रवेश करताच प्रसन्न वातावरणगावात प्रवेश करताच चहूबाजूला पाहिले तर, प्रसन्न वातावरण दिसून येते. कुठेही कचरा आढळून येत नाही. आशिया खंडात स्वच्छतेत एक नंबर आलेल्या या गावाने स्वच्छतेच्या जोरावरच  देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गावात पर्यटकांची अक्षरश: रिघ लागत आहे. याचा फायदा या गावाने उचलला आहे. स्वच्छतेचे जगभरात या गावाचे नाव झाले आहे. ही संधी साधत त्यांनी पर्यटनाचे मार्केटिंग केले.विविध करांतून उत्पन्न वाढविलेदेश-विदेशातील पर्यटक गावाची स्वच्छता पाहण्यासाठी येतात. या स्वच्छतेतून उत्पन्नही या गावाने उपलब्ध करून दिले आहे. गावात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी ४० रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. पार्किंग कर घेतला जातो. तसेच बाथरूमसाठीही पैसे आकारले जातात. यातून त्यांनी आपल्या गावचे उत्पन्न वाढवले आहे. शासनाच्या विविध योजना अगदी प्रामाणिकपणे प्रशासनाच्या सहकार्याने राबविल्या जात असल्याचे सांगितले. एमआरजीएस या योजनेतून गावाचा कायापालट केला. रस्ते, गटार, घराच्या दारासमोर फुलझाडे, आतूनच पाईपलाईन गटार अगदी स्वच्छ होती.बारकाईने स्वच्छता जपलीतेथील ग्रामस्थ घरांवर जास्त पैसे खर्च करत नसल्याचे दिसून आले. घरे अतिशय साध्या पद्धतीची परंतु देखणी.  दोन आणि तीन खोल्यांची घरे आहेत. घरात चुलीही आहेत. मात्र, घराची ठेवण अगदी स्वच्छ आहे. एवढ्या बारकाईने त्यांनी स्वच्छता जपली आहे. प्रत्येक घराच्या समोर डस्टबिन ठेवला आहे. अतिशय साधे परंतु बांबूच्या साहाय्याने तयार केलेले डस्टबिन दिसले. यासाठी वेगळ्या प्रकारे निविदा काढावी लागत नाही. अशा देखण्या व स्वच्छ गावात गेल्याचे समाधान वाटते.या दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, रवी गावडे, बाळ खडपकर, संजय वालावलकर, संदीप गावडे, विनोद दळवी, नंदकुमार आयरे, लवू म्हाडेश्वर, गुरू दळवी, विनोद परब, मनोज वारंग, सतीश हरमलकर, गिरीश परब सहभागी झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग