शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता समितीची पुनर्रचना करावी

By admin | Updated: October 2, 2016 00:11 IST

नीतेश राणे : सभेत नोंदवला आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहाराची सूचना

वैभववाडी: दक्षता समितीत ‘आमदार नियुक्त’ सदस्यांचा समावेश केला गेला नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी दक्षता समिती नियमबाह्य असल्याचा आक्षेप सभेत नोंदविला. तसेच समितीच्या पुनर्रचनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची सूचना समिती सचिव तथा तहसीलदार संतोष जाधव यांना दिली. शुक्रवारी तहसीलदारांनी आपल्या अधिकारात आयोजित केलेल्या सभेचे आमंत्रण नसल्याने आमदार राणे यांनी जाधव यांना फैलावर घेत सभा रोखली होती. त्यामुळे ती सभा शनिवारी आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला सभापती शुभांगी पवार व गटविकास अधिकारी मिलिंद जाधव तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, उपसभापती बंड्या मांजरेकर, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, नगरपंचायत शिक्षण सभापती अक्षता जैतापकर आदी उपस्थित होते. आमदार राणे यांनी समितीच्या रचनेबाबत विचारणा केली. त्यावेळी पुरवठा निरिक्षक स्वप्नील प्रभू यांनी दक्षता समितीच्या रचनेसंबंधीचे शासन परिपत्रक वाचून दाखवले. त्यावेळी ही समिती कोणी गठीत केली? समितीत आमदार नियुक्त सदस्य कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी तहसीलदार जाधव यांना केला. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून समितीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याचे तहसीलदार संतोष जाधव यांनी सांगितले. त्यामुळे समितीत रास्त धान्य दुकानदारांचा प्रतिनिधीही नाही. मग त्यांच्या अडचणी कोण मांडणार? असा प्रश्न उपस्थित करून ही समिती नियमबाह्य आहे. त्यामुळे दक्षता समितीच्या रचनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची सूचना तहसीलदार संतोष जाधव यांना केली. तालुक्याला मंजूर कोट्याप्रमाणे केरोसिन व धान्य पुरवठा केला जातो का? अशी विचारणा आमदार राणे यांनी केली. त्यावर पुरवठा निरीक्षक प्रभू यांनी धान्य पुरेसे येते. मात्र, केरोसिनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे सांगितले. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याची सूचना आमदार राणे यांनी केली. सभेला भाजप व शिवसेनेचे समिती सदस्य अनुपस्थित राहिले. (प्रतिनिधी) हा तर जनतेचा हक्कभंग! धान्य वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवणे आणि लोकांच्या समस्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाने दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. परंतु, शासन निर्णयानुसार येथील दक्षता समितीची रचनाच झालेली नाही. हा जनतेच्या हक्काचा भंग आहे. त्यामुळे या समितीच्या रचनेबाबत पत्रव्यवहार करा, चर्चाही करा. गरज असेल तर मला सांगा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हाधिका-यांना मीसुद्धा भेटेन, असे आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार संतोष जाधव यांना सांगितले.