शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ गेम धारकांकडून १५ लाखांच्या खंडणीची मागणी, परशुराम उपरकर यांची निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

By सुधीर राणे | Updated: June 11, 2024 13:11 IST

कणकवली: जिल्ह्यातील व्हिडीओ गेम चालकांकडून १५ लाखांच्या खंडणीची मागणी त्यांच्याबाबत पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यानेच केली आहे. त्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल ...

कणकवली: जिल्ह्यातील व्हिडीओ गेम चालकांकडून १५ लाखांच्या खंडणीची मागणी त्यांच्याबाबत पोलिसांकडे तक्रार करणाऱ्यानेच केली आहे. त्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्याद्वारे संबंधितावर गुन्हा दाखल करावा.तसेच जिल्ह्यात अवैधरित्या व्हिडीओ गेम चालविले जात असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पोलिस अधीक्षक व  जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील व्हिडीओ गेम सेंटर अथवा पार्लर चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळाअंतर्गत घेतला आहे. त्या सर्व व्हिडिओ गेमच्या ठिकाणी जुगार किंवा परवान्याच्या नियमात नसलेले जुगार सदृश गेम  खेळले जातात. संबधित परवाना हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या नियमात दिला जातो त्या नियमात ते खेळले जात नाहीत. त्या ठिकाणी अवैध जुगार चालू असतो, याची तपासणी करुन कारवाई करणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवैध व्हिडिओ गेमबाबत एक तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिस विभागाकडून कुडाळ तालुक्यातील काही व्हिडिओ गेम परवाने रद्द करण्यात आले आहेत, असे समजते. संबधित तक्रारदार यांनी या तक्रारी केल्यानंतर व काही कारवाई झाल्यानंतर व्हिडिओ गेमच्या मालकांकडून १५ लाखांची खंडणी मागितली आहे.त्यामुळे व्हिडिओ गेम परवानगीधारक यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे त्याबाबत तक्रार दिलेली आहे.  व्हिडिओ गेम परवानाधारकांकडून जे पैसे मागितले गेले त्याबाबतच्या मोबाईलवरील संभाषणाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर सोमवारी ३ मे २०२४ रोजी रात्री ११.३० दरम्यान व्हायरल झाली होती. ती क्लिप आपणाकडे आपल्या भ्रमणध्वनीवर पाठवलेली आहे. त्या क्लिपमध्ये तक्रारदार व्हिडिओ गेम धारकांकडून १५ लाखांची मागणी करत असल्याचे ऐकू येत आहे.

प्रशासन कोणताही व्हिडिओ गेम बंद करु शकत नाही. ते व्हिडिओ गेम मी एकटा बंद करु शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्हिडिओ गेमची अचानक तांत्रिक तपासणी करण्यात यावी. जर व्हिडिओ गेम खेळ म्हणून खेळले जात असतील तर त्या पार्लरवर कारवाई करू नये.  तांत्रिक पद्धतीने जुगार किंवा खेळाडूंची लूट ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ गेमच्या माध्यमातून केली जात असेल तर त्या परवानाधारकाचा परवाना रद्द करुन त्याच्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे त्या तक्रारदारावरती कारवाई करुन खंडणीसारखा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर