सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यातून सर्वसामान्य माणसापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडले नव्हते. मात्र कोरोनाच्या विळख्यात वरिष्ठ अधिकारीही सापडू लागले असून, सिंधुदुर्गचे नूतन उपवनसंरक्षक एस. डी. नारनवर हे कोरोनाच्या विळख्यात सापडले असून, सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना कोल्हापूरला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र कोरोनाबाधित असलेला सिंधुदुर्गातील पहिलाच वरिष्ठ अधिकारी आहे.सिंधुदुर्गात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही रुग्णसंख्या तीन हजारांच्या घरात गेली आहे. या कोरोनाच्या विळख्यातून सर्वसामान्य माणसापासून ते मोठमोठे राजकारणीही सुटले नाहीत. अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. असे असतानाच या कोरोनाच्या विळख्यात मात्र वरिष्ठ अधिकारी आले नव्हते. मात्र आता सिंधुदुर्गचे नूतन उपवनसंरक्षक एस. डी. नारनवर हेही कोरोनाच्या विळख्यात सापडले असून, त्यांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यांना कोल्हापूर येथे उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभाग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, सावंतवाडी नगरपालिकेला याबाबत माहिती मिळाली असता नगरपालिका आरोग्य विभागाकडूनही कार्यालयाची चाचपणी करण्यात आली. तसेच सूचनाही देण्यात आल्या आहेत. वनविभागातील एक कर्मचारी चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर थेट उपवनसंरक्षकांनाच बाधा झाल्याने आता अधिकारी व कर्मचारी चांगलेच भयभीत झाले आहेत. अनेक अधिका-यांनी तसेच कर्मचा-यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी अशी, सूचनाही नगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्गातील पहिला वरिष्ठ अधिकारी कोरोनाच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 18:09 IST