शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कवी विद्याधर करंदीकर यांचे निधन

By admin | Updated: October 2, 2016 00:09 IST

सिंधुदुर्गातील साहित्य क्षेत्रावर शोककळा

कणकवली : ज्येष्ठ कवी डॉ. विद्याधर करंदीकर (वय ५९) यांचे शनिवारी कणकवली येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा होते असे वाटल्यावर त्यांना शनिवारी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे सकाळी ११ वाजता निधन झाले. कवी, बालनाटककार, मराठी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेले डॉ. करंदीकर यांचा जन्म २ नोव्हेंबर १९५८ रोजी झाला. ते कणकवली येथे दंतवैद्यक होते. मराठी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेले डॉ. करंदीकर हे अनेकांचे चालताबोलता संदर्भग्रंथ होते. ‘मराठी कवीची नाट्यसृष्टी - स्वरूप विशेष’ यावरील प्रबंधाला त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाला सर्वोत्तम प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार लाभला होता. ‘कवी नाटककार सावरकर’ या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रत्नागिरी येथे यावर्षी २८ जानेवारीला करण्यात आले. ‘स्वच्छंद’चे विंदांसमोर सादरीकरण डॉ. करंदीकर हे विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखनाच्या कार्यशाळा आवर्जून घेत असत. वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खांडेकरांच्या निवडक साहित्यावर आधारित कार्यक्रम ‘अमृतधारा’ याचे लेखन डॉ. करंदीकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारण करण्यात आले होते. विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम विंदांसमोर सादर करून त्याची वाहवा डॉ. विद्याधर करंदीकर यांनी मिळविली होती. (प्रतिनिधी) बालनाट्याला शासनाचा पुरस्कार त्यांचा ‘चंदनी धुक्यामध्ये’ कवितासंग्रह विशेष गाजला. त्यांची ‘किनारा’ ही कविता सहावीच्या अभ्यासक्रमात होती. त्यांच्या ‘पहिला माझा नंबर’ या बालनाट्याला शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.