शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील सातारड्याच्या माजी सरपंचांची गळफास घेत आत्महत्या

By अनंत खं.जाधव | Updated: March 22, 2023 17:59 IST

सावंतवाडी : सातार्डा येथील माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या ...

सावंतवाडी : सातार्डा येथील माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर (वय ८९) यांनी आपल्या घरासमोरील फणसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आज, बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्यांनी पहाटे आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मांजरेकर यांना गेले काही दिवस डोळ्यांनी दिसत नव्हते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांनी बारा वर्षें सातार्डा गावचे सरपंचपद भूषविले होते. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरु होते. दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना अस्पष्ट दिसत होते.या घटनेची माहिती मुलगा महेंद्र मांजरेकर यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर यांचे ते वडील होत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग