प्रसन्न राणे ल्ल सावंतवाडीगेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील बाजारातील भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. मात्र, मंगळवारपासून पावसाचे सावट दूर झाल्याने भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरण्याची शक्यता विके्रत्यांनी वर्तविली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर वाढलेलेच दिसून येत आहेत. याचा फटका ग्राहकांबरोबरच भाजी विक्रेत्यांनाही बसत आहे. वाढती महागाई सर्वसामान्य जनतेला जगणे नकोसे करुन टाकत असतानाच परतीच्या पावसानेही महागाई वाढविण्यात हातभार लावलेला आहे. शेतकऱ्यांना यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे भाज्यांचे उत्पन्न चांगले मिळणार असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आकांक्षावर पाणी फेरले. गेल्या वर्षीच्या दरांच्या तुलनेत यावर्षी भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. याचा फटका भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास भाज्यांचे दर पुन्हा वाढण्याचीही शक्यता आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने वाढसन २०१३ चा विचार करता कोथिंबीर १० रुपये पेंडी, कोबी २० रुपये किलो, मिरची ३० रुपये किलो, गाजर ४० रुपये किलो, भेंडी ३० रुपये किलो, वाली ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलो, ढबू मिरची ३० रुपये किलो, दुधी २० रुपये किलो तर लिंबू दहा रुपयांना पाच नग अशा किमती होत्या. २०१४ च्या पावसाळ्यात फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो व कोथिंबीर २० रुपये पेंडी झाली होती. श्रावण महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर वाढून फरसबी १२० रुपये, मिरची १२० रुपये, गाजर १२० रुपये, भेंडी ६० रुपये, वाली ६० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ५० रुपये प्रती किलो आणि कोेथिंबीर ४० रुपये पेंडी व लिंबू १० रुपये एक नग अशा पद्धतीने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. ४अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेतील भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली होती. ४याचा फटका सामान्य जनतेलाही बसला. यामुळे गेले काही दिवस भाज्यांचे दर गगनाला भिडले होते.४परंतु मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेत भाज्यांच्या दरात घट होईल असे विक्रेत्यांना वाटत आहे. ४ दर वाढूनही भाज्यांची खरेदी-विक्रीची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होती. ऐन श्रावण महिन्यातही भाजी दरवाढीमुळे नागरिकांना मोठा फटका बसला होता. पावसाचा हंगाम संपूनही पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने याचा परिणाम भाजी पिकांवर होऊन भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परतीच्या पावसामुळे फरसबीच्या दराने १२० रुपयांचा अंक गाठला. इतर भाज्यांचे दरही वाढले होते. परंतु पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हे दर पुन्हा एकदा खाली उतरले आहेत. यामध्ये फरसबी ६० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ४० रुपये, गाजर ६० रुपये, भेंडी ५० रुपये, वाल ४० रुपये, वांगी ४० रुपये, ढबू मिरची ६० रुपये, दुधी ४० रुपये प्रती किलो तसेच कोथिंबीर २० रुपये पेंडी व लिंबू १० रुपयांना तीन नग अशी भाज्यांच्या दरात घट झाली आहे.
भाज्यांचे दर भडकले
By admin | Updated: October 31, 2014 00:40 IST