रत्नागिरी : वस्तीशाळांमधील निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून कायम करण्याचा निर्णय झाला असला तरी त्यांचे भवितव्य अजूनही अधांतरीत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षक असल्याने त्याचा फटका या वस्तीशाळांतील निमशिक्षकांना बसला आहे.जिल्ह्यात दुर्गम, डोंगराळ भागातील वाडीवस्त्यांवरील वस्तीशाळा काही वर्षांपूर्वी सुरु करण्यात आल्या. जिल्ह्यात ९१ वस्तीशाळा होत्या. या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शाळाही बंद करण्यात आल्या.या शाळांवरील निमशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर कंत्राटी शिक्षक म्हणून काम करीत होते, तर वस्तीशाळांमधील काही शिक्षकांनी नोकरी सोडून अन्य मार्ग पत्करला होता. वस्तीशाळांच्या या शिक्षकांना कायम करण्याची मागणी अनेकदा शासनाकडे केली होती. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही जिल्ह्यातील ८४ शिक्षक अल्प मानधनामध्ये कंत्राटी पध्दतीने काम करीत होते. शिक्षकांप्रमाणे पूर्णवेळ काम करणाऱ्या या शिक्षकांच्या किरकोळ मानधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वेळोवेळी करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करुन शासनाने फेबु्रवारी, २०१४ मध्ये त्यांना प्राथमिक शिक्षकाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा जिल्ह्यातील ८४ शिक्षकांना होणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. मात्र, शासनाचा निर्णय होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप त्यांना कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपेक्षा जादा शिक्षकांचा प्रश्न सुटलेला नसल्याने या शिक्षकांवर अजूनही टांगती तलवार कायम आहे.जिल्ह्यातील वस्तीशाळा व त्यामधील शिक्षक यांचे प्रमाण हा नेहमी चर्चेचा मुद्दा असतो. जिल्ह्यात ८४ शिक्षक अल्प मानधनामध्ये कंत्राटी पध्दतीने काम करतात. या शिक्षकांचे काम पूर्णवेळ सुरू असून तुटपंूज्या मानधनामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)८४ शिक्षकांना अल्प मानधनशासनाकडून मागण्यांचा विसरजिल्ह्यात ९१ वस्तीशाळामंजूर पदांपेक्षा जादा शिक्षकांमुळे निमशिक्षकांना फटकाशिक्षकाचा दर्जा द्यावा
वस्तीशाळा शिक्षकांचे भवितव्य अधांतरीच
By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST