शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाफोली धरण कोरडे

By admin | Updated: May 20, 2016 22:44 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार : मान्सून लांबल्यास समस्या वाढणार

बांदा : वाफोली गावचे जीवनदायिनी असणारे लघु पाटबंधारे विभागाचे धरण हे पूर्णपणे कोरडे पडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लांबण्याचे संकेत दिल्याने पाण्याअभावी स्थानिकांना भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे.वाफोली पंचक्रोशीत हरितक्रांती व्हावी यासाठी इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात धरणात मुबलक पाणीसाठा होत असल्याने हा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला होता. मात्र, कालांतराने धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने धरणातून पाणी गळती होऊ लागली. याचा विपरीत परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा विपरीत परिणाम होतो.गतवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात धरणाच्या मुख्य गेटचा दरवाजा तुटल्याने या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाहून गेला होता. त्यामुळे गेल्यावर्षी ऐन एप्रिल महिन्यातच या धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली होती. यावर्षी देखील तशीच परिस्थिती असून मे महिन्यात या धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने वाफोली गावातील बागायती शेती पूर्णपणे करपून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी होतो. (प्रतिनिधी)पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे --दरवर्षी धरण कोरडे पडत असल्याने उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीकडे लघु पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.