शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वैभव नाईक यांचे पंख शिवसेनेने छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:00 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले असून, त्यांच्याकडे आता कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख पद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा तालुक्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिवसेना भवनातून करण्यात आली.

ठळक मुद्देवैभव नाईक यांचे पंख शिवसेनेने छाटले, फक्त दोन तालुक्यांचे कारभारी संजय पडते यांच्याकडे कणकवलीसह सहा तालुक्यांची जबाबदारी

सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे पंख छाटण्यात आले असून, त्यांच्याकडे आता कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांचे जिल्हाप्रमुख पद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा तालुक्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली आहे. याबाबतची घोषणा शिवसेना भवनातून करण्यात आली.चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. या बैठकीत प्रत्येक तालुकाप्रमुखांकडून कामांची माहिती घेतली होती. यावेळी अनेक तालुकाप्रमुखांनी विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या विरोधात थेट तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांना यापुढे संघटनेच्या कामात लक्ष न घालता कुडाळ व मालवण मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.तेव्हा वैभव नाईक यांचे जिल्हाप्रमुख पद जाणार हे निश्चित झाले होते. गेले दोन ते तीन दिवस जिल्हाप्रमुख म्हणून कोणाची वर्णी लावायची यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख ठेवायचे की एकच जिल्हाप्रमुख ठेवायचा यावर विचार झाला.सुरुवातीला कुडाळ, सावंतवाडी वेंगुर्ले व दोडामार्गसाठी एक जिल्हाप्रमुख तर उर्वरित चार तालुक्यांसाठी एक असे दोन जिल्हाप्रमुख नेमायचे असा विचार झाला होता. यासाठी दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी तसेच संजय पडते हे या चार तालुक्यांसाठी इच्छुक होते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर आणि मालवण येथील बबन शिंदे हे इच्छुक होते. मात्र  प्रमुख नेत्यांच्या बैठकीत कणकवली व सावंतवाडी या विधानसभा मतदार संघासाठी एक जिल्हाप्रमुख तर कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांसाठी विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना कायम केले आहे.

संजय पडते मूळचे शिवसैनिक असले तरी मध्यंतरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत ते काँग्रेसमध्ये गेले. जेव्हा राणे काँग्रेसमध्ये जात होते त्यावेळीही पडते हेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांचे राणे यांच्या समवेत बिनसले आणि त्यांनी राणेंपासून फारकत घेत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची एसटी कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात आली होती. तर जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही ते निवडून आले आहेत.

आता थेट त्यांना ६ तालुक्यांचे जिल्हाप्रमुख करून शिवसेनेने त्यांचे पुन्हा पुनर्वसनच केले आहे. तर विद्यमान जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे कुडाळ व मालवण मतदारसंघाचे आमदार असून, आता त्याच मतदारसंघाचे त्यांना जिल्हाप्रमुख केल्याने त्यांचे पंख छाटण्यात आल्याचे बोलले जात आहे.वेंगुर्लेचे तालुकाप्रमुख बदललेशिवसेनेने वेंगुर्लेचे तालुकाप्रमुख बाळा दळवी यांना बदलेले असून, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब यांची तालुकाप्रमुख पदी वर्णी लावली आहे. दळवी यांनी दोन वर्षांपूर्वीच तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्यांना आता बदलण्यात आले आहे. त्यांच्या नावाची घोषणाही शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक